आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल महिला सांघिक क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नेमबाज, रमिता, मेहुली घोष आणि आशी चोकसी यांचे कौतुक केले आहे.
या पराक्रमाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले, "हे रौप्य पदक तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. हाच जोश कायम ठेवत #AsianGames2022 मध्ये चमकदार कामगिरी सातत्याने करत राहूया."
"Taking aim and hitting the mark! 🎯🥈
— SAI Media (@Media_SAI) September 24, 2023
Our incredible trio and #TOPSchemeAthletes @Ramita11789732 @GhoshMehuli and Ashi Chouksey in the 10m Air Rifle Women's team event secured a stellar 2️⃣ place with a score of 1886.0 🇮🇳🌟
Well done, Champs👍🏻#Cheer4India#Hallabol… pic.twitter.com/3ovelv1WXQ


