LVM3 चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एस आय एल अर्थात न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, ईन-स्पेस आणि इस्रो चे अभिनंदन केलं आहे.
वन वेब(OneWeb) च्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"36 @OneWeb उपग्रहांसह, LVM3 चे आणखी एक यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल, @NSIL_India @INSPACeIND @ISRO चं अभिनंदन. आत्मनिर्भरतेचे तत्व खऱ्या अर्थाने अनुसरत असताना हे यश जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा पुरवठादार म्हणून भारताचं जागतिक पटलावरील स्थान अधिक मजबूत करते."
Congratulations @NSIL_India @INSPACeIND @ISRO on yet another successful launch of LVM3 with 36 @OneWeb satellites. It reinforces India’s leading role as a global commercial launch service provider in the true spirit of Aatmanirbharta. https://t.co/GflGAN2Wlr
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2023