पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथल्या रस्ते अपघातातल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे.
या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली आहे.
या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50, 000 रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.
कानपुर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इस हादसे में कई लोगों को अपनी जान गंवानी पड़ी है। मैं उनके परिजनों के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं, साथ ही घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 8, 2021


