पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या जनतेचे, दैनंदिन आयुष्यात योगअभ्यासाचा समावेश करण्यासाठी तसेच आरोग्य आणि निरोगी राहाण्याच्या देशव्यापी चळवळीला चालना देण्याच्या प्रेरणादायी वचनबद्धतेचे कौतुक केले.
मोदी यांनी, 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमादरम्यान, राज्यातील तळागाळातील लोकांचा उत्साह आणि योगान्ध्र उपक्रमाला सक्रीय पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
एक्स या समाजमाध्यमावरील गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संदेशावर उत्तर देताना पंतप्रधान म्हणालेः
"योगाने लोकांना पुन्हा एकदा एकत्र आणले!
आंध्र प्रदेशच्या जनतेने, योगाभ्यासाचा समावेश त्यांच्या दैनंदिन आयुष्यात करण्यासाठी, या चळवळीला जी बळकटी दिली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक. # योगान्ध्र उपक्रम आणि मी सहभाग घेतलेला विशाखापट्टणम् मधील कार्यक्रम नेहमीच अनेक लोकांना चांगले आरोग्य आणि तंदुरूस्तीसाठी प्रेरणा देत राहील."
Yoga brings people together, once again!
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2025
Compliments to the people of Andhra Pradesh for the manner in which they have strengthened the movement to make Yoga a part of their lives. The #Yogandhra initiative and the programme in Visakhapatnam, which I also took part in, will… https://t.co/p00EQGm0o0


