पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम शाश्वततेला प्रोत्साहन देतो आणि ‘नेट-झिरो’ उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या बांधिलकीला बळकट करतो.
कांडला येथील दीनदयाल बंदर प्राधिकरणाने सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“ही प्रशंसनीय कामगिरी आहे, जी शाश्वततेला प्रोत्साहन देते आणि आपल्या नेट-झिरो दृष्टिकोनाला बळकटी देते.”
This is a commendable effort, championing sustainability and powering our Net-Zero vision. https://t.co/lmT17VOSBo
— Narendra Modi (@narendramodi) August 3, 2025


