खेलो इंडिया या उपक्रमाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. या निमित्त या उपक्रमाने, देशातील क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी पार पाडलेल्या भूमिकेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या एका ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे;
“खेलो इंडियाची 5 वर्षे साजरी करत असताना, देशातील क्रीडा प्रतिभेला, क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ देण्यासाठी या उपक्रमाने बजावलेल्या प्रशंसनीय भूमिकेची दखल घेणे समयोचित ठरेल. आमचे सरकार भारतात क्रीडाक्षेत्राच्या भरभराटीसाठी पोषक वातावरण निर्माण करत राहील.”
As we mark #5YearsOfKheloIndia, we acknowledge the role played by this initiative in encouraging sporting talent and giving a great platform to athletes to shine. Our Government shall continue to create the ideal environment for sports to thrive in India. https://t.co/kGM23DIAbV
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2023


