सन्माननीय पंतप्रधान नेत्यनाहू,

माझ्या बंधू-भगिनींनो,

शालोम ले कुलाम अनी सेमिया मायोद लेहीयोत पो (इस्रायलमध्ये येऊन मला अतिशय आनंद झाला आहे.) इस्रायलचा दौरा करणारा पहिला भारतीय पंतप्रधान म्हणून मला हा वैयक्तिक सन्मान मिळाला आहे. मला इस्रायलला येण्याचे निमंत्रण दिल्याबद्दल तसेच माझे इतक्या आपुलकीने स्वागत केल्याबद्दल मी, माझे मित्र, पंतप्रधान नेत्यनाहू यांचा आभारी आहे. दोन्ही देशांमधल्या शतकांपासूनच्या दृढ संबंधांचा उत्सव या भेटीमध्ये साजरा होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या राजनैतिक संबंधांमध्ये कायमच एक शाश्वत आणि दृढ बंध जपला गेला आहे.

मित्रांनो,

इस्रायलच्या जनतेने लोकशाही मूल्यांवर आधारित एका देशाची निर्मिती केली आहे. तसेच अपरंपार कष्ट, सदिच्छा आणि नाविन्याच्या प्रेरणेतून त्यांनी हा देश घडवला आहे. आलेल्या अनेक अडथळयांना तुम्ही पार केले आणि आव्हानांचे संधीत रुपांतर केले. तुमच्या या कामगिरीला भारताचा सलाम !

आज 4 जुलै आहे. 41 वर्षांपूर्वी याच दिवशी इस्रायलमध्ये ऑपरेशन एन्टेबे झाले होते. याच दिवशी इस्रायलच्या अनेक ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करतांना तुमचे पंतप्रधान बीबी यांचे मोठे बंधू योनी यांना वीरमरण आले होते. तुमचे हे वीर आणि त्यांचे कर्तृत्व आजही नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.

मित्रांनो,

भारत ही अतिशय जुनी नागरी संस्कृती असली तरीही ते युवा राष्ट्र आहे. भारतातले 80 कोटी नागरिक 35 वर्षे वयाखालील आहे. भारताचे गुणवान आणि कुशल युवक आमच्या देशाला पुढे नेणारी शक्ती आहे. भारताला, भारतातील उद्योग, अर्थव्यवस्था, व्यापार करण्याची पध्दत आणि जगाचा सामना करण्याची दृष्टी या सर्व बाबतीत माझ्या दृष्टीकोनाला ही युवा शक्ती सत्य स्वरुपात आणते आहे.

मित्रांनो,

आमच्या या शाश्वत आणि गतिमान वृध्दीत व सर्वांगिण विकासात इस्रायल हा अतिशय महत्वाचा भागिदार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि उच्च तंत्रशिक्षण यांच्या आधारे विकासातील आव्हानांचा सामना करण्याचा दोन्ही देशांचा सामायिक प्रयत्न आहे. याच क्षेत्रात दोन्ही देशातील कुशल युवा शक्ती आणि स्वयं उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या सर्जनशील ऊर्जेचा आणि कल्पनांचा वापर करण्यासाठी दोन्ही राष्ट्र उत्सुक आहे. त्याशिवाय वित्तीय समृध्दीसाठी व्यापक भागिदारी निर्माण करणे, संरक्षण क्षेत्रात सहकार्य करुन दहशतवादाचा मुकाबला करणे हे आमचे सामायिक उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नेत्यनाहू यांच्यासोबत माझे होणारे संभाषण या सर्व क्षेत्रात एक प्रगतीशील भागिदारी निर्माण करण्यासाठी आकार देणारे ठरेल. तसेच इस्रायलमधील भारतीय समुदाय आणि भारतीय वंशाच्या ज्यू नागरिकांसोबत संवाद साधण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. या संवादातून दोन्ही देशांच्या नागरिकांना लाभ होईल.

 

 

 

मान्यवर आणि मित्रांनो,

माझ्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमध्ये एका नव्या प्रवासाची नोंद होणार आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांच्या कल्याणासाठी हा एकत्रित प्रवास करण्यास दोन्हीकडचा समाज अतिशय उत्सुक आहे. आपल्या या एकत्रित प्रवासातून भारत आणि इस्रायल दरम्यान एक भक्कम आणि मजबूत भागिदारी तयार व्हावी असा माझा उद्देश आहे. आपण केलेल्या भव्य स्वागताबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो.

धन्यवाद. खूप-खूप धन्यवाद.

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Tea exports increased from $852mn in 2023-24 to $900mn in 2024-25: Tea Board

Media Coverage

Tea exports increased from $852mn in 2023-24 to $900mn in 2024-25: Tea Board
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 मार्च 2025
March 24, 2025

Viksit Bharat: PM Modi’s Vision in Action