पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकला भेट देणार असून दिवसभरात ते 3 जाहीरसभांना संबोधित करतील.
धर्मस्थळ येथे श्री मंजुनाथ स्वामी मंदिरात पूजा करून पंतप्रधान दौऱ्याचा प्रारंभ करतील. त्यानंतर उजीरे इथल्या श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्पात पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थींना रुपे कार्डचं वाटप करण्यात येईल. उजीरे येथे पंतप्रधान जाहीर सभेलाही संबोधित करतील.
त्यानंतर पंतप्रधान बंगळुरूला रवाना होतील. दशमाह सौंदर्य लहरी प्रयणोत्सव महासमर्पण येथे ते सभेला संबोधित करतील. सौदर्य लहरी हे आदी शंकाराचार्यांनी रचलेले श्लोक आहेत. या श्लोकांचे सामूहिक पठण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते बिदर येथे बिदर-कलबुर्गी या नवीन रेल्वे मार्गाचेही उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान इथंही सार्वजनिक सभेला संबोधित करतील.


