पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. खापरी-सिताबर्डी या 13.5 कि.मी. लांबीच्या नागपूर मेट्रो रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी डिजिटली बटण दाबून केले.

महाराष्ट्रातील नागपूर येथे दुसरी मेट्रो सेवा चालू झाल्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, वर्ष 2014 मध्ये नागपूर मेट्रोच्या पायाभरणी कार्यक्रम हा माझ्यासाठी विशेष क्षण होता. मेट्रोमुळे प्रवाशांना नागपूरमध्ये मूल्य आणि पर्यावरणात्मक मैत्रीचे वातावरण म्हणजेच सुखद प्रवास मिळणार आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, नागपूरच्या विकासासाठी आणि भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकार निरंतर कार्य करत होते. नागपूर मेट्रोमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि शहरांचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आधुनिक दळणवळण पद्धतीमध्ये केलेल्या आमूलाग्र बदलांवर आणि प्राथमिकतेवर प्रकाशझोत टाकतांना पंतप्रधान म्हणाले की, मागील साडेचार वर्षामध्ये देशभरात 400 कि.मी.चे मेट्रोचे जाळे विस्तारले गेले असून 800 कि.मी. मेट्रो जाळे विकासाधीन आहे.

पंतप्रधानांनी ‘वन नेशन वन कार्ड, कॉमन मोबिलिटी कार्ड’चा शुभारंभ अलिकडेच केला असून त्याचे फायदे लोकांना मिळणे सुरू झाले असल्याचे सांगितले. भारतीयांची इतर देशांवर असलेले अवलंबित्व या विविध कार्डमुळे कमी झाले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166

Media Coverage

India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 मे 2026
May 16, 2026

Petroleum Reserves Secured, Dollars Pouring In, AI Supercluster Rising — Welcome to PM Modi’s New India