शेअर करा
 
Comments
PM Modi inaugurates Y01 Naturopathic Wellness Centre in New York via video conferencing

नमस्कार,

निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनासाठी न्यूयॉर्क इथं जमलेले मान्यवर आणि आमंत्रित पाहुणे, हा समारंभ ऑनलाइन आणि दूरचित्रवाणीवर बघणारे प्रेक्षक आणि माझ्या बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

आज सकाळी,हिमालयाच्या कुशीतल्या डेहराडून या अत्यंत निसर्गरम्य शहरात विविध क्षेत्रातल्या हजारो लोकांसोबत योगदिन साजरा करण्याची संधी मला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून मी जगभरातल्या लोकांचे योगदिन साजरा करत असलेले, विविध कार्यक्रमांचे फोटो बघतो आहे. खरंच, गेल्या तीनच वर्षात योग ही एक जनचळवळ बनली आहे. इतकंच नाही तर अनेक देशातल्या लोकांच्या सार्वजनिक जीवनाचा योग हा अविभाज्य घटक झाला आहे. केवळ योगदिनालाच नाही, तर एरवीही योगविद्येचा आज मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचं आपल्याला जाणवते. भारतात, मला योगदिन साजरा करण्याच्या तीन वेगवेगवेगळ्या संकल्पना आढळल्या. मला खात्री आहे की इतर देशांमध्येही ह्याच संकल्पना असतील.

पहिली संकल्पना म्हणजे, लक्षावधी लोकांना ह्यामुळे योगाभ्यास सुरु करण्याचं निमित्त मिळालं. योगाचे फायदे कळल्यामुळे, त्याचं महत्त्व समजून अनेकांनी योगाभ्यास आणि योगप्रसार करण्याचे ध्येय मनाशी ठरवले आहे.

दुसरी, जे आधीपासूनच योगाभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठीही आंतरराष्ट्रीय योगदिनाचा हा उत्सव त्यांच्या योगकार्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरतो आहे. यानिमित्त ते पुन्हा एकदा स्वतः योगप्रसार करण्यासाठी सिद्ध होतात.

तिसरी संकल्पना म्हणजे योगाचा प्रचार आणि प्रसार. अशा हजारो व्यक्ती आणि संस्था, ज्यांना योगाचा लाभ झाला आहे, त्या यानिमित्ताने योगविद्येपासून दूर असलेल्या लोकांपर्यत पोहोचत आहेत, त्यांना योगाचं महत्त्व पटवून देत आहेत.

या सगळ्या प्रक्रियेत, आतंरराष्ट्रीय योगदिवस हा जगातल्या अनेक देशात एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आहे. योग या शब्दाचा अर्थ आहे “जोडणे”, एकत्र येणे! म्हणूनच, योगामध्ये जगभरातल्या लोकांची वाढलेली रुची, माझ्या मनात नवी आशा निर्माण करते आहे, ही आशा, की भविष्यात योग संपूर्ण जगाला जोडणारी शक्ती बनू शकेल.

या निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनासाठी तुम्ही आज योगदिनाचा मुहूर्त निवडलात, याचा मला विशेष आनंद आहे. या निसर्गोपचार केंद्रातल्या सर्व उपचार पद्धती आणि चिकित्सेमध्ये योगाभ्यासाला विशेष स्थान मिळेल, अशी माझी अपेक्षा आहे.

मित्रांनो,

योग आणि आयुर्वेदासारख्या पारंपारिक भारतीय चिकित्सा पद्धती आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात. आपल्यातले जन्मजात दौर्बल्य कमी करण्यासाठी, तन-मन सुदृढ करण्यासाठी या चिकित्सा आपल्याला मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे या उपचारपद्धती आपल्या शरीरावर आक्रमण करत नाही, किंवा त्या केवळ तात्पुरता इलाजही करत नाहीत.तर, ज्यांना आजकालच्या उपचार पद्धतीची सवय आहे, अशांसाठी तर योग उपचारपद्धती शरीराला नवी उर्जा देतात. आजकालच्या आधुनिक जीवनशैलीची किंमत आपल्या शरीराला आणि मनालाही मोजावी लागते. आज ज्या उपचारपद्धती अस्तित्वात आहेत, त्यांचा भर दुर्दैवाने आजार बरा करण्यावर आहे, आजार प्रतिबंधनावर नाही. सध्या आपल्यासमोर आरोग्याची, विविध आजारांची जी आव्हानं आहेत, त्यांचा सामना करण्यासठी आपल्याला आत्ताच्या औषधोपचारांची गरज आहे, यात वादच नाही. मात्र, हे ही तितकेच खरे, की अशा उपचारातून आजार सर्वांगीण बरा होत नाही, काहीतरी त्रुटी राहूनच जातात. आयुर्वेद आणि योग या त्रुटी भरून काढत शरीर-मन पूर्णतः निरोगी ठेवू शकतात, हे सत्य आता जगभरातल्या वैद्यकतज्ञानी मान्य केलं आहे. ही उपचार पद्धती शरीराच्या सर्वांगीण आरोग्यावर भर देते.

ही सर्वांगीण व्यवस्था आजार होण्यापासूनचा शरीराचे रक्षण करते. आपण ही सर्वांगीण उपचारपद्धती स्वीकारल्यास, स्वतःचे आणि आपल्या समुदायाचे आरोग्य कायमच उत्तम राखू शकतो. अनेकांचा असा गैरसमज आहे की योग म्हणजे केवळ व्यायाम किंवा आसने. मात्र तसे नाही. योग म्हणजे स्वतःचे शरीर, मन आणि आत्मा यांचा शोध! यामुळे आपले स्वतःविषयीचे आकलन वाढते, आत्मज्ञान वाढून आत्म्याची उन्नती होते. यातून आपल्याला सामाजिक शिस्तही लाभते, सामाजिक संकेत आणि जीवनमूल्ये पाळण्याची वृत्ती वाढते. योग आपल्याला मुक्तीच्या, चिंतामुक्त जीवनाच्या मार्गावर नेणारे सखोल तत्वज्ञान आहे.

मित्रांनो,

माझा असा दृढ विश्वास आहे की योगाचा काहीही धर्म नाही. योगाभ्यासाचे फायदे प्रत्येकाला मिळतात. आजकालच्या आधुनिक योगपद्धतीत अनेक प्राचीन विद्यांचा समावेश केलेला आहे. यात नैतिक आणि मानवी मूल्ये, आपले शरीर सुदृढ ठेवण्यासाठीचे व्यायाम, गुरुचे आदेश पाळणे, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, मंत्रोच्चार, प्राणायाम अशा सगळ्याचा समावेश आहे. योगाचा भर व्यक्तीची जीवनशैली बदलण्यावर आहे, त्यामुळे योगाभ्यास केल्यास चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार सहजच टाळता येतील. दररोज योगाभ्यास केला तर त्याचे अनेक फायदे आहेत, जसे की आरोग्य सुधारणे, भावनिक संतुलन, बौद्धिक कार्यक्षमता वाढणे आणि आयुष्यातला आनंद वाढणे.. काही आसने आणि प्राणायाम केल्यास आपण अनेक आजार टाळू शकतो यावर भारतीयांचा शतकानुशतके विश्वास आहे.आज आधुनिक विज्ञानानेही या विश्वासावर पुराव्यांच्या आधारे शिकामोर्तब केले आहे. योगाच्या मदतीने शरीरातील अनेक अवयव, जसे हृद्य, मेंदू आणि अंत:स्त्राव ग्रंथी नियंत्रणात ठेवता येतात, हे आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केलं आहे.

आज, पाश्चिमात्य देशात योगाविषयीची रुची झपाट्याने वाढते आहे. अनेक पाश्चिमात्य देशात योग जास्त लोकप्रिय झाला आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. एकट्या अमेरिकेत आज २० दशलक्ष लोक योगाभ्यास करतात आणि दरवर्षी हा आकडा किमान ५ टक्क्यांनी वाढतोय, असं मला सांगण्यात आलं आहे.अमेरिका आणि युरोपातील अनेक आधुनिक वैद्यकसंस्थांनी शारीरिक विकार दूर करण्यसाठी औषधोपचारांसोबत योग उपचारपद्धतीही सुरु केली आहे. अलीकडे, योगावर अनेक संशोधने, अध्ययन झाले. पुराव्यानिशी सिद्ध झालेल्या परंपरागत उपचारपद्धती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात लागू करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. गेल्यावर्षी आम्ही जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात, आम्ही रोग प्रतिबंधात्मक उपायांवर अधिक भर दिला आहे. बिगर-संसर्गजन्य आजारांचे प्रतिबंधन आणि नियंत्रण करण्यासाठी आम्ही मोहीम हाती घेतली आहे. भारत हा जगात सर्वाधिक लोकसंख्येचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, त्यामुळे, या अफाट देशात आम्ही हाती घेतलेल्या आरोग्य मोहिमेचे दृश्य परिणाम दिसण्यास काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र मला विश्वास आहे की त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसू लागतील.

शेवटी, मी इतकेच सांगेन, ह्या निसर्गोपचार केंद्रात जे रुग्ण शारीरिक आराम आणि आजारांपासून मुक्ती मिळवायला येतील, त्यांना योगाचे लाभ निश्चितच मिळतील. आरोग्याचा जो मार्ग तुम्ही निवडला आहे, त्यातून व्यक्तिगत आयुष्य अधिक निरोगी आणि निरामय होईल, अशी खात्री मला वाटते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, विश्वास आणि शास्त्रशुद्ध योगचिकित्सा आवश्यक असून ती इथे अवलंबली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. विश्वास आणि शास्त्रशुद्ध चिकित्सेच्या दृष्टीकोनातून काम केल्यास हे केंद्र अमेरिकेत योगाच्या सार्वजनिक आरोग्य चळवळीत महत्वाचे योगदान देऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. या केंद्रामुळे 500 थेट तर हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत, याचा मला विशेष आनंद आहे.एका अर्थाने हे केंद्र तुमच्या समुदायासाठी महत्वाचे स्थान ठरणार आहे. तुमच्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा !!

धन्यवाद! खूप खूप धन्यवाद !

 

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln

Media Coverage

India's forex kitty increases by $289 mln to $640.40 bln
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 नोव्हेंबर 2021
November 27, 2021
शेअर करा
 
Comments

India’s economic growth accelerates as forex kitty increases by $289 mln to $640.40 bln.

Modi Govt gets appreciation from the citizens for initiatives taken towards transforming India.