शेअर करा
 
Comments
Knowledge and education are not bound to books: PM Modi
Balanced development cannot be pursued without Innovation, says PM Modi
We should we not only educate students in the classrooms of colleges and universities, but also sync them with the expectations of our country: PM Modi
PM Modi says to improve the infrastructure of education, the RISE i.e. Revitalisation of Infrastructure and Systems in Education program has been started
We must realize that in today's world, no country, society or individual can sustain in an isolated state. It is crucial that we develop a vision of 'Global citizen and Global village': PM

नवी दिल्ली इथे झालेल्या शिक्षणविषयक पुनरुज्जीवनासाठी अकादमिक नेतृत्व परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मार्गदर्शन केले.

जेव्हा आपण पुनरुज्जीवन किंवा पुनर्निर्मितीविषयी विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे पहिली प्रतिमा येते ती स्वामी विवेकानंद यांची, ज्यांनी भारतीय संस्कृतीची, भारतीय विचारधारेची ताकद पहिल्यांदा जगासमोर आणली, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

स्वावलंबन, चारित्र्यनिर्माण, मानवी मूल्ये आणि भारतीय शिक्षणपरंपरा यांना स्वामी विवेकानंद यांनी दिलेले महत्व पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. आज, नवनवीन संशोधन हे शिक्षणाचा महत्वाचा घटक बनले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

प्राचीन भारतीय साहित्य, वेदांचा आपल्या भाषणात उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की ज्ञानाशिवाय आपले आयुष्य, आपला देश, आपला समाज या कशाचीही आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही. आपली प्राचीन विद्यापीठे, जसे तक्षशीला, नालंदा, विक्रमशीला यात ज्ञानाइतकेच संशोधनाला महत्व देण्यात येत असे. बाबसाहेब भीमराव आंबेडकर, दीनदयाल उपाध्याय आणि डॉ राममनोहर लोहिया यांच्या शिक्षणविषयक विचारांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

आज कुठलीही व्यक्ती अथवा समाज, एकटे, इतरांपासून वेगळे आयुष्य जगू शकत नाही. त्यामुळे ‘जागतिक नागरिक’ आणि ‘वैश्विक गाव’ अशा संकल्पनांचा आपल्या विचारत समावेश करायला हवा असं आवाहन त्यांनी केलं. समाजासमोर आज असणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे ते म्हणाले. शिक्षणसंस्था आणि संशोधन तसेच नवनवीन कल्पनांना जन्म देणारे विचार यांची सांगड घालायला हवी, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.आपल्या अभ्यासाची सांगड जनतेच्या इच्छाआकांक्षांशी घालून त्यादृष्टीने शिक्षण-संशोधन करा, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ‘अटल टीन्करिंग’ प्रयोगशाळांची त्यांनी माहिती दिली. शैक्षणिक पायाभूत सुविधा अधिक उत्तम करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या राईज म्हणजे-‘शिक्षणव्यवस्था आणि पायाभूत सुविधा पुनरुज्जीवन” या कार्यक्रमाची त्यांनी माहिती दिली. उच्चशिक्षण क्षेत्रात सरकारने केलेल्या कामांचा त्यांनी उल्लेख केला.

उत्तम शिक्षक निर्माण होणे समाजासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशात डिजिटल तंत्रज्ञानाविषयी जागृती आणि प्रसार करण्यासाठी आणि सरकारी कार्यक्रम तसेच योजनांची माहिती लोकांपर्यत पोचवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

आज भारतीय तरुणांनी “ब्रांड इंडीया” ला जागतिक ओळख दिली आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. युवकांमधील गुणवत्तेला संधी आणि पाठबळ देणाऱ्या स्टार्ट-अप इंडीया, स्टँड -अप इंडीया, स्कील इंडिया या योजनांची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली.

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report

Media Coverage

Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 28 ऑक्टोबर 2021
October 28, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens cheer in pride as PM Modi addresses the India-ASEAN Summit.

India appreciates the various initiatives under the visionary leadership of PM Modi.