Science and technology ecosystem should be impactful as well as inspiring: PM Modi
Scientific Temper wipes out superstition: PM Modi
There are no failures in science; there are only efforts, experiments and success: PM

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज कोलकाता इथे आयोजित 5 व्या भारतीय अंतर्राष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.

यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की महोत्सवाची संकलपना  “ RISEN -संशोधन, नवउन्मेष आणि विज्ञानाच्या माध्यमातून देशाचे सक्षमीकरण’’ ही असून यामध्ये 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षा प्रतिबिंबित होतात.

ते म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समाजावर मोठा प्रभाव आहे. म्हणूनच सरकार शोध आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक पातळीवर मदत करत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी एका सशक्त परिसंस्थेचे समर्थन करताना पंतप्रधान म्हणाले की देशात नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत.देशात ५ हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आणि 200 हून अधिक अटल इंक्यूबेशन केंद्र स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.  

“आपले जीवनमान सुधारण्यात विज्ञान कशा प्रकारे सहायक ठरेल यावर विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच समाजासाठी विज्ञानाची  प्रासंगिकता आहे. जेव्हा  प्रत्येक वैज्ञानिक आणि नागरिक या विचाराने काम करेल तेव्हा देश प्रगती करेल " असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी लोकांना विज्ञानाच्या दीर्घकालीन लाभ आणि उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली. ते म्हणाले कि यासाठी सर्वानी आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानकांबाबत सजग असायला हवे.    

आपण सर्वाना चांगले माहित आहे की तंत्रज्ञान दोन घटकांचा परिणाम आहे- एक समस्या अस्तित्वात असणे आणि दोन या समस्या सोडवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न. विज्ञान कधीही अयशस्वी होत नाही. यात केवळ प्रयत्न,  प्रयोग आणि यश असते. जर तुम्ही काम करताना एवढे ध्यानात ठेवले तर तुम्हाला तुमच्या वैज्ञानिक शोधात किंवा तुमच्या आयुष्यात कधीही कुठलीही अडचण भासणार नाही असे ते म्हणाले. 

Click here to read PM's speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool

Media Coverage

How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology