वाराणसीतल्या दीनदयाळ हस्तकला संकुलात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या पूर्ण सत्राचे उद्‌घाटन केले.

प्रवासी भारतीय दिवस 2019 चे प्रमुख पाहुणे प्रविंद जुगनॉथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारतीय समुदायाला आपल्या मातृभूमीविषयी असलेले प्रेम आणि ओढ आज त्यांना येथे घेऊन आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवभारताच्या उभारणीसाठी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी अनिवासी भारतीय समुदायाला केले.

वसुधैव कुटुंबकम्‌ची परंपरा जिवंत ठेवण्यात भारतीय समुदायाच्या योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. अनिवासी भारतीय केवळ भारताचे ब्रँड ॲम्बेसिडर्स नसून, भारताची ताकद, क्षमता आणि वैशिष्ट्यांचे प्रतिनिधित्व ते करतात.

नवभारताच्या उभारणीत विशेषत: संशोधन आणि नवीनतम शोधात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी भारतीय समुदायाला केले.

भारताच्या प्रगतीचा वेग पाहता संपूर्ण जगभरात भारताकडे अत्यंत आदराने पाहिले जात असून, जगाचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत भारत आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हे एक त्याचे उदाहरण आहे. स्थानिक तोडगा आणि वैश्विक उपयोजन हा आपला मंत्र असल्याचे मोदी यांनी सांगितले. एक जग, एक सूर्य, एक ग्रीड या दिशेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हे एक पाऊल असल्याचे ते म्हणाले.

जागतिक आर्थिक सत्ताकेंद्र होण्याच्या वाटेवर भारत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सर्वात मोठ्यांपैकी एक स्टार्ट अप परिसंस्था आणि जगातली सर्वात मोठी आरोग्यनिगा योजना भारताच्या नावावर आहे. मेक इन इंडियात मोठा टप्पा आपण गाठला आहे. कृषी उत्पादन विक्रमी स्तरावर आहे.

आधीच्या सरकारच्या काळात इच्छाशक्ती आणि योग्य धोरणांचा अभाव यामुळे लाभार्थ्यांसाठी असलेला पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. आज मात्र तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंत्रणेतील त्रुटी आम्ही दूर केल्या आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. सार्वजनिक निधीची लूट थांबवण्यात आली आहे आणि अपहृत होणारा 85 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तो थेट हस्तांतरित होत आहे. आता गेल्या साडेचार वर्षात 5,80,000 कोटी रुपये लोकांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. लाभार्थ्यांच्या यादीतून कशी 7 कोटी बनावट नावे, जी संख्या ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीच्या लोकसंख्ये एवढी आहे, ती गाळण्यात आली, ते पंतप्रधानांनी सांगितले.

आपल्या सरकारच्या काळात झालेल्या बदलांची ही काही उदाहरणे आहे, जी नवभारताच्या नव्या आत्मविश्वासात प्रतिबिंबित होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

अनिवासी भारतीयांच्या सुरक्षेची काळजी आपल्याला कायम असून, संकट क्षेत्रात अडकलेल्या दोन लाखांहून अधिक भारतीयांच्या सुटकेचे आव्हान सरकारने कसे पेलले ते पंतप्रधानांनी सांगितले.

पासपोर्ट आणि व्हिजा नियम सुलभ करण्यात आला असून, सर्व अनिवासी भारतीय आता पासपोर्ट सेवेशी जोडले गेले आहेत आणि चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.

प्रवासी तीर्थ दर्शन योजनेला मूर्त स्वरुप दिले जात असून, भारतीय नसलेल्या 5 कुटुंबांना भारत भेटीसाठी आमंत्रित करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांना केले. गांधीजी आणि गुरु नानक देव यांच्या मूल्यांचा प्रसार करण्याचे आणि त्यांच्या जयंती समारंभात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

समारंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी काशीच्या रहिवाशांचे कौतुक केले. समारंभाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी भारतीय समुदायाच्या आणि मातृभूमीशी असलेल्या बंधाशी निगडित आठवणींना उजाळा दिला. हिंदी आणि इंग्रजीत त्यांनी भाषण केले. जर भारत वैशिष्ट्यपूर्ण असेल तर भारतीय वैश्विक असल्याचे ते म्हणाले. शिक्षित आणि स्वावलंबी समुदाय राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी सांगितले.

भोजपुरी बोलीने त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. पहिल्या आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सवाचे आयोजन मॉरिशस करेल, असे त्यांनी सांगितले.

समारंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी काशीच्या रहिवाशांचे कौतुक केले. समारंभाचे प्रमुख पाहुणे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी भारतीय समुदायाच्या आणि मातृभूमीशी असलेल्या बंधाशी निगडित आठवणींना उजाळा दिला. हिंदी आणि इंग्रजीत त्यांनी भाषण केले. जर भारत वैशिष्ट्यपूर्ण असेल तर भारतीय वैश्विक असल्याचे ते म्हणाले. शिक्षित आणि स्वावलंबी समुदाय राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतो, असे मॉरिशसच्या पंतप्रधानांनी सांगितले.

भोजपुरी बोलीने त्यांनी उपस्थितांना जिंकून घेतले. पहिल्या आंतरराष्ट्रीय भोजपुरी महोत्सवाचे आयोजन मॉरिशस करेल, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वाचा आज भारताला अभिमान असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.

प्रवासी भारतीय दिवसाचा समारोप उद्या 23 जानेवारी 2019 ला होणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करतील.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Unemployment rate falls to 4.7% in November, lowest since April: Govt

Media Coverage

Unemployment rate falls to 4.7% in November, lowest since April: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 डिसेंबर 2025
December 15, 2025

Visionary Leadership: PM Modi's Era of Railways, AI, and Cultural Renaissance