शेअर करा
 
Comments
On one hand, the Government is trying to make the Armed Forces stronger; and on the other hand, there are those who do not want our Armed Forces to be strong: PM Modi
When it comes to the country's security and the requirements of the Armed Forces, our Government keeps only the interest of the nation in mind: PM
Those who deal only in lies are casting aspersions on the defence ministry, on the Air Force, and even on a foreign government: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी रायबरेली येथील रेल्वेचे अत्याधुनिक डबे बनवणाऱ्या कारखान्याला भेट दिली. त्यानंतर झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी हमसफर रेल्वेगाडीचा डबा आणि 900 व्या कोचला हिरवा झेंडा दाखवला. त्याचवेळी त्यांनी रायबरेली येथील विविध विकास कामांचे उद्‌घाटनही, पायाभरणी आणि लोकार्पणही केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज पायाभरणी आणि लोकार्पण केलेले विविध प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचे आहेत.

या अत्याधुनिक कोच कारखान्यामुळे युवकांना रोजगार मिळतो आहे, तसेच या कारखान्यांमुळे रायबरेली शहर रेल्वे कोच बनवण्याचे जागतिक केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजच्याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबरला वर्ष 1971 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा पराभव केला होता, याचे स्मरणही पंतप्रधानांनी केले. दहशतवाद, क्रौर्य आणि अराजकतेचे प्रतीक असलेल्या सैन्याचा भारतीय सेनेनं पराभव केला होता, असे मोदी म्हणाले. आज एकीकडे सरकार सैन्यदलाचे हात अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. 

मात्र त्याचवेळी दुसरीकडे, असे काही लोक आहेत, ज्यांना भारतीय सैन्य सक्षम व्हायला नको आहे.

 

ते केवळ खोट्याच्या भरवशावर संरक्षण मंत्रालय, हवाई दल आणि अगदी विदेशी सरकारांवर सुद्धा आरोप करत आहेत, अशी टीका पंतप्रधानांनी केली. जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो, सैन्यदलाच्या संरक्षणसिद्धतेचा विषय असतो, तिथे केंद्र सरकार केवळ देशाचे हितच लक्षात घेईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे, असं त्यांनी सांगितले. त्याचाच भाग म्हणून 22 पिकांसाठीच्या किमान हमीभावात सरकराने वाढ केली आहे.

 

नैर्सर्गिक संकटात ज्या शेतकऱ्यांची पिके नष्ट झालीत अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळतो आहे, असे पंतप्रधानानी सांगितले.

 

‘सबका साथ, सबका विकास’ करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
We look forward to productive Parliament session: PM Modi after all-party meeting

Media Coverage

We look forward to productive Parliament session: PM Modi after all-party meeting
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 16 नोव्हेंबर 2019
November 16, 2019
शेअर करा
 
Comments

PM Shram Yogi Mandhan Yojana gets tremendous response; Over 17.68 Lakh Women across the nation apply for the same

Signifying India’s rising financial capacity, the Forex Reserves reach $448 Billion

A New India on the rise under the Modi Govt.