शेअर करा
 
Comments
Bhutan holds a special place in the hearts of 130 crore Indians: PM
It is an honour for India to partner Bhutan in its development journey: PM Modi
Glad that we have launched RuPay cards in Bhutan today: PM Modi

भूतानचे सन्माननीय पंतप्रधान,

आणि माझे मित्र छेरिंग,

प्रतिष्ठीत पाहुणे,

बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार,

भारताचा अविभाज्य आणि खास मित्र असलेल्या भूतानमध्ये तुम्हा सर्वांसोबत उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. माझा आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचा जो आदर सत्कार केला त्यासाठी मी पंतप्रधान आणि भूतानच्या सरकारचे मनःपूर्वक आभारी आहे.

 

महामहीम,

भारत भूतानच्या अद्वितीय मैत्रीबद्दल असलेल्या तुमच्या उदार विचारांबद्दल मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. 130 कोटी भारतीयांच्या मनात भूतानचे विशेष स्थान आहे. पंतप्रधान म्हणून माझ्या मागील कार्यकाळात  माझ्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भूतानची निवड करणे हे फारच स्वाभाविक होते. यावेळी देखील पंतप्रधान म्हणून माझ्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला भूतानला येऊन मला खूप आनंद होत आहे. भारत आणि भूतान मधील संबंध हे उभय देशातील लोकांची प्रगती, समृद्धी आणि सुरक्षेच्या समान हितांवर अवलंबून आहेत आणि म्हणूनच त्यांना दोन्ही देशांमधील लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे.

 

महामहीम,

भारतीय म्हणून सादर जनतेच्या निर्णायक जनादेशाने, हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भूतान नरेश आणि तुमच्या सोबत काम करण्याची मला पुन्हा एकदा संधी दिली हे माझे सौभाग्य आहे. आज मला भूतान नरेशांसोबत आपल्या भागीदारीविषयी चर्चा करण्याची संधी मिळाली; आणि थोड्यावेळानंतर मी सन्माननीय चतुर्थ नरेशांची देखील भेट घेणार आहे. आमच्या द्विपक्षीय संबंधांना भूतानच्या महाराजांची बुद्धिमत्ता आणि दूरदर्शी दृष्टीमुळे दीर्घकाळापर्यत मार्गदर्शन मिळाले आहे. एवढेच नव्हेतर त्यांच्या दूरदृष्टीमुळे जगासमोर भूतानला एक अद्वितीय उदाहरण म्हणून सादर केले आहे, जिथे विकासाचे मोजमाप हे आकड्यांवरून नाही तर सुख समाधानाद्वारे  मापले जाते. जिथे परंपरा आणि पर्यावरणा सोबत आर्थिक विकास होतो. असा मित्र आणि शेजारी कोणाला नको?

 

मित्रांनो,

भूतानच्या विकासात भारत हा एक मुख्य भागीदार आहे. ही आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे. भूतानच्या पंचवार्षिक योजनांमध्ये भारताचे सहकार्य ही तुमची इच्छा आणि प्राधान्यांवर पुढे देखील सुरूच राहील.

 

मित्रांनो,

जलविद्युत हे उभय देशांमधील सहकार्याचे महत्वाचे क्षेत्र आहे. दोन्ही देशांनी एकत्रित येवून भूतानच्या नद्यांच्या  सामर्थ्याला केवळ उर्जेतच परावर्तीत केले नाहीतर परस्पर समृद्धी देखील बहाल केली. आज आम्ही मांगदेछू प्रकल्पाच्या उद्घाटना सोबतच या प्रवासातील अजून एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. उभय देशांच्या सहकार्यामुळे भूतानमध्ये जलविद्युत उत्पादन क्षमता 2000 मेगावॉटहून अधिक झाली आहे. मला विश्वास आहे की इतर प्रकल्पांचा विकास देखील याच गतीने होईल.

 

महामहीम,

भूतानच्या सामान्य नागरिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी, भारतातून प्रती माह होणारा 700 मेट्रिक टन एलपीजीचा पुरवठा वाढवून आता 1000 मेट्रिक टन करण्यात आला आहे. यामुळे गावांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवण्यास मदत होईल.

 

मित्रांनो,

डॉक्टर छेरिंग यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत त्यांनी मला सांगितले होते की, सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या प्रेरणेतूनच ते राजकारणात आले. त्यांच्या या दूरदृष्टीने मी प्रभावित झालो आहे. भूतानमध्ये बहु-उद्दिष्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करेल.

 

महामहीम,

सार्क चलन स्वॅप आराखड्यांतर्गत, भूतानसाठी चलनातील स्वॅपची मर्यादा वाढवण्यासाठी आमचे मत सकारात्मक आहे. या दरम्यान, परदेशी चलनाची आवश्यकता  पूर्ण करण्यासाठी भूतानला स्टँडबाय स्वॅप व्यवस्थेखाली 100 मिलियन डॉलर उपलब्ध होतील.

 

मित्रांनो,

अंतराळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भूतानमध्ये जलदगतीने विकास करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही आज दक्षिण आशियाई उपग्रहाच्या अर्थ स्टेशनचे उद्घाटन केले. यामुळे भूतानमध्ये दळणवळण, सार्वजनिक प्रसारण आणि आपदा व्यस्थापनाची व्याप्ती वाढेल. या हेतूंसाठी भूतानच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त बँडविड्थ आणि ट्रान्सपोंडर देखील उपलब्ध करुन देण्यात येतील. उभय देश छोट्या उपग्रहांची निर्मिती आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रयोगांमध्ये देखील सहकार्य करेल. भारताच्या नॅशनल नॉलेज नेटवर्कशी संलग्न होऊन भूतानचे विद्यार्थी आणि शोधकर्तांना भारतीय महाविद्यालयांमध्ये सहभागी होता येईल. उभय देशांमध्ये सामायिक ज्ञान समाज स्थापन करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, ज्याचा लाभ मुख्यत्वे आपल्या युवकांना होणार आहे.

रॉयल भूतान विद्यापीठ आणि भारतीय आयआयटी आणि काही इतर उच्च शिक्षण संस्था यांच्यातील सहयोग आणि संबंध आजच्या शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या आवश्यकतेनुसार आहेत. उद्या मी रॉयल भूतान विद्यापीठात या देशातील हुशार तरुणांना भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

 

मित्रांनो,

भूतानमध्ये आज रूपे कार्डचे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे. यामुळे डिजिटल देयक आणि व्यापार तसेच पर्यटनातील आपले संबंध अधिक दृढ होतील. आमचा सामायिक आध्यात्मिक वारसा अधिक मजबूत होत आहे आणि उभय  देशांमधील लोकांचे संबध हेच आमच्या संबंधाचे प्राण आहेत. हेच लक्षात ठेऊन नालंदा विद्यापीठात भुतानसाठी पदव्युत्तर शिष्यवृत्तीच्या जागा वाढवून दोन वरून पाच करण्यात आल्या आहेत. मला आज शब-दुरुंगचा आशीर्वाद मिळाला आहे.

 

महामहीम,

भूतान सोबतच्या संबंधांचा इतिहास जितका गौरवशाली आहे, भविष्य देखील तितकेच आशादायी आहे. दोन देशांमधील संबंध कसे असावेत हे दाखवण्यासाठी भारत आणि भूतान हे जगासमोर एक उत्तम उदाहरण सादर करतील अशी मला आशा आहे.

या सुंदर ड्रुक यूल मध्ये पुन्हा येण्याची संधी दिल्याबद्दल, तुमच्या आदरातिथ्यासाठी आणि प्रेमासाठी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.

ताशी देलक !

 

 

Inspire India's Olympians! #Cheers4India
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Big dip in terrorist incidents in Jammu and Kashmir in last two years, says government

Media Coverage

Big dip in terrorist incidents in Jammu and Kashmir in last two years, says government
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 30 जुलै 2021
July 30, 2021
शेअर करा
 
Comments

PM Modi extends greetings on International Tiger Day, cites healthy increase in tiger population

Netizens praise Modi Govt’s efforts in ushering in New India