शेअर करा
 
Comments
This is the strength of the farmers of our country that the production of pulses has increased from almost 17 million tonnes to 23 million tonnes in just one year: PM
100% neem coating of urea has led to its effective utilisation: PM
Due to Soil health Cards lesser fertilizers are being used and farm productivity has gone up by 5 to 6 per cent: PM Modi
We have announced ‘Operation Greens’ in this year’s budget, we are according TOP priority to Tomato, Onion, Potato: PM Modi
Promoting use of solar energy will lead to increase in the income of farmers: PM Modi

 

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.

  विषयावर आधारित सात गटांनी खालील विषयावर सादरीकरण केले.

  • धोरण आणि प्रशासन सुधारणा
  • कृषी व्यापार धोरण आणि निर्यात प्रोत्साहन, बाजारपेठ संरचना आणि विपणन कार्यक्षमता
  • मूल्य श्रृंखला आणि पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन
  • विज्ञान तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रात स्टार्ट अप
  • शाश्वत आणि न्याय विकास आणि प्रभावी सेवा प्रदान
  • भांडवली गुंतवणूक आणि शेतकऱ्यांसाठी संस्थागत पत
  • पशुधन, दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनाला विकासाचे इंजिन म्हणून चालना

या सादरीकरणाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. देशातल्या शेतकऱ्यांनी विशेषत: डाळ उत्पादनातल्या उल्लेखनीय वाढीबद्दल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजनांची मालिका हाती घेतली आहे असे सांगून या संदर्भात त्यांनी चार पैलूंचा उल्लेख केला, कच्च्या मालाची किंमत कमी करणे, उत्पादनाला वाजवी दाम मिळण्याची खातरजमा करणे, नासाडी कमी करणे आणि उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण करणे याचा त्यात समावेश आहे.

100 नीमवेष्टीत युरिआमुळे, युरिआची कार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे उत्पादकताही वाढली आहे. मृदा आरोग्य कार्डामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादनही वाढले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

अद्याप अपूर्ण राहिलेले 99 सिंचन प्रकल्प, केंद्र सरकार मार्गी लावत आहे. यापैकी 50 प्रकल्प यावर्षी पूर्ण होतील अशी पुस्ती त्यांनी जोडली. एकेक सिंचन प्रकल्प पूर्ण होत जाईल तसतशी शेतकऱ्याला कच्च्या मालासाठी मोजावी लागणारी किंमत कमी होईल. आतापर्यंत 20 लाख हेक्टर कृषी क्षेत्र प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

यावर्षीच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आलेल्या “ऑपरेशन ग्रीन” मुळे टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. योग्य पायाभूत सुविधांसह 22,000 ग्रामीण हाटचा दर्जा उंचावण्यात येत असून ई-नाम मंचाशी ते एकीकृत करण्यात येत आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतापासून 5 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रातल्या बाजारपेठेशी जोडण्याची सुविधा उपलब्ध राहील.

शेतकऱ्यांना ऋण सहज उपलब्ध व्हावे यासाठी कृषी ऋणासाठी वाढीव निधी मंजूर केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

कृषी क्षेत्राशी संबंधित वाया जाणाऱ्या वस्तूंचे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

 

Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
PM Modi announces contest to select students who will get to attend 'Pariksha pe Charcha 2020'

Media Coverage

PM Modi announces contest to select students who will get to attend 'Pariksha pe Charcha 2020'
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 डिसेंबर 2019
December 06, 2019
शेअर करा
 
Comments

PM Narendra Modi addresses the Hindustan Times Leadership Summit; Highlights How India Is Preparing for Challenges of the Future

PM Narendra Modi’s efforts towards making students stress free through “Pariksha Pe Charcha” receive praise all over

The Growth Story of New India under Modi Govt.