The Centre and state government must work together for the growth of Bihar: PM Modi
PM Modi lays the foundation stone for Namami Gange and National Highways project in Mokama
We always launch a scheme and make sure that we prepare a roadmap to fulfill it too, says PM Modi
Projects whose foundation stones are being laid will give impetus to Bihar's development: PM

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या मोकामा इथे, ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत,  चार सांडपाणी व्यवस्थापन  प्रकल्पांचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 3700 कोटी रुपये आहे.

महान कवी रामधारी सिंग दिनकरजी यांच्याशी निकट असलेल्या या भूमीला भेट दिल्याने आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी विशाल जाहीर सभेत बोलतांना सांगितले. बिहारच्या विकासासाठी, केंद्र आणि राज्य सरकार, सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना  दिले. 

जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आपले सरकार अथक कार्य करत आहे. आज ज्या प्रकल्पांचे भूमी पूजन झाले, त्या प्रकल्पांमुळे, बिहारच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

रस्ते बांधणीचा वेग वाढवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे असे सांगून, नमामि गंगा उपक्रमाअंतर्गत असलेले प्रकल्प, गंगा नदीच्या संवर्धनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.

नुकत्याच सुरु झालेल्या अंत्योदय एक्सप्रेसचा उल्लेख करत, यामुळे बिहार, पूर्व भारत आणि देशाचा इतर भाग यांच्यातले दळण-वळण वाढणार आहे. उत्तम दळण-वळण सुविधांमुळे विकासाला चालना मिळते  असे सांगून, रस्ते, रेल्वे, आणि जल मार्गावर भर देण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

.

आज भूमी पूजन झालेल्या चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमध्ये यांचा समावेश आहे :

  • राष्ट्रीय महामार्ग 31 च्या औंता- सिमरिया दरम्यानचे चौपदरीकरण आणि सहापदरी गंगा सेतूची उभारणी
  • राष्ट्रीय महामार्ग 31 च्या बख्तियारपूर-मोकामाचे चौपदरीकरण
  • राष्ट्रीय महामार्ग 107 च्या महेशखुंट- सहारसा- पूर्णिया दरम्यानचे दुपदरीकरण
  • राष्ट्रीय महामार्ग 82 च्या बिहार शरीफ-बारबीघा-मोकामा दरम्यान दुपदरीकरण

बेऊर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, बेऊर सांडपाणी यंत्रणेसह सांडपाणी जाळे, करमाळीचाक इथला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सैदपूर इथला एस टी पी आणि सांडपाणी जाळे, यांचा या चार सांडपाणी प्रकल्पात समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमुळे, एस टी पी क्षमता 120  एम एल डी वर पोहचणार आहे. बेऊर इथली सध्याची क्षमता 20 एम एल डी असून त्यात वाढ  होणार आहे.

Click here to read the full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's airport passenger handling capacity crosses 580 million: Govt

Media Coverage

India's airport passenger handling capacity crosses 580 million: Govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth
August 04, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam applauding the effort and dedication of India's Youth:

"न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ॥"

Shri Modi said that through continuous effort and dedication, our talents are honed and refined, and our youth is imbibing these very qualities and bringing glory to India.

The Prime Minister posted on X:

निरंतर प्रयास और साधना से हमारी प्रतिभा और निखरती है। आज हमारे युवा इन्हीं गुणों को आत्मसात कर दुनियाभर में देश का नाम रोशन कर रहे हैं।

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।

तत्स्वयं योगसंसिद्ध: कालेनात्मनि विन्दति ॥