QuotePM congratulates Harivansh Narayan Singh on being elected as Deputy Chairperson of Rajya Sabha
QuoteWorking closely with Chandra Shekhar Ji, Harivansh Ji knew in advance that Chandra Shekhar Ji would resign. However, he did not let his own paper have access to this news. This shows his commitment to ethics and public service: PM
QuoteHarivansh Ji is well read and has written a lot. He has served society for years: PM Modi

राज्यसभेच्या उपसभापतीपदी हरीवंश यांची आज निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची अभिनंदन केले.

निवडणुकीनंतर पंतप्रधानांनी वरिष्ठ सदनात भाषण केले. सभागृह नेते अरुण जेटली यांची प्रकृती सुधारुन ते पुन्हा सदनात कार्यरत होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

|

आजच्या ऑगस्ट क्रांती दिनाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. हरीवंशजी 1857 च्या स्वातंत्र्यसमरापासून स्वातंत्र्यलढ्याशी जोडल्या गेलेल्या बलिया इथले आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आहे.

हरीवंशजी यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांच्याबरोबर काम केले असल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.

|

चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करत असताना, चंद्रशेखर राजीनामा देणार असल्याचे हरीवंश यांना आधीच माहिती होते. मात्र या बातमीचा त्यांनी स्वत:च्या वृत्तपत्रालाही सुगावा लागू दिला नाही. यातून नैतिकता आणि सार्वजनिक सेवेविषयी त्यांची प्रतिबद्धता व्यक्त होते; असे पंतप्रधान म्हणाले.

हरीवंश उत्तम वाचक असून त्यांनी विपूल लिखाण केले आहे. हरीवंश यांनी समाजाची अनेक वर्ष सेवा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

|

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी बी.के.हरीप्रसाद यांचे अभिनंदन केले. निवडणूक सुरळीतपणे पार पडल्याबद्दल सभापती आणि सर्व सदस्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले.

Click here to read full text speech

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
With growing disposable income, middle class is embracing cruise: Sarbananda Sonowal

Media Coverage

With growing disposable income, middle class is embracing cruise: Sarbananda Sonowal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM commends efforts to chronicle the beauty of Kutch and encouraging motorcyclists to go there
July 20, 2025

Shri Venu Srinivasan and Shri Sudarshan Venu of TVS Motor Company met the Prime Minister, Shri Narendra Modi in New Delhi yesterday. Shri Modi commended them for the effort to chronicle the beauty of Kutch and also encourage motorcyclists to go there.

Responding to a post by TVS Motor Company on X, Shri Modi said:

“Glad to have met Shri Venu Srinivasan Ji and Mr. Sudarshan Venu. I commend them for the effort to chronicle the beauty of Kutch and also encourage motorcyclists to go there.”