शेअर करा
 
Comments
“यापूर्वी गुजरातमध्ये आणि आता राष्ट्रीय स्तरावर, माझ्या 20 वर्षांच्या कार्यकाळात पर्यावरण आणि शाश्वत विकासावर मी नेहमीच भर दिला ”
"गरीबांसाठी समान ऊर्जा उपलब्धता हा आमच्या पर्यावरण धोरणाचा कणा आहे"
"भारत हा विविधतेने नटलेला महान देश आहे आणि या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे"
"शाश्वत पर्यावरण केवळ हवामान न्यायाद्वारेच साध्य केले जाऊ शकते"
'भारतीयांची ऊर्जेची गरज पुढील वीस वर्षांत जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. ही ऊर्जा नाकारणे म्हणजे लाखो लोकांचे जीवन नाकारण्यासारखे आहे ".
"विकसित देशांनी वित्त आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करणे आवश्यक आहे"
"शाश्वत जागतिक समानतेसाठी समन्वित कृती आवश्यक आहे"
“सगळीकडे जागतिक ग्रिडमधून स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. हाच ''संपूर्ण जागतिक'' दृष्टीकोन आहे ज्यात भारताची मूल्ये महत्वाची आहेत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या (TERI) जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत व्हिडीओ संदेशाद्वारे उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. डोमिनिकन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना जे मोहम्मद,  आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यावेळी उपस्थित होते.

आधी गुजरातमध्ये आणि आता राष्ट्रीय स्तरावर, त्यांच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात पर्यावरण आणि शाश्वत विकासावर आपण नेहमीच भर दिल्याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. ते म्हणाले की ही वसुंधरा नाजूक नाही तरतिच्याप्रति, निसर्गाशी असलेली  बांधिलकी नाजूक आहे. 1972 च्या स्टॉकहोम परिषदेपासून गेल्या 50 वर्षांत बरीच चर्चा होऊनही फारच कमी काम झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  पंतप्रधान म्हणाले की, भारतात आपण यासाठी काम सुरू केले आहे.  "गरीबांसाठी समान ऊर्जा उपलब्ध करून देणे हा आपल्या  पर्यावरण धोरणाचा कणा  आहे", उज्ज्वला योजनेंतर्गत 90 दशलक्ष कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ  इंधन आणि पीएम-कुसुम योजनेंतर्गत शेतकर्‍यांना नवीकरणीय  ऊर्जा पुरवणे  यासारखी पावले उचलली आहेत, तसेच  शेतकर्‍यांना सौर पॅनेल बसवण्यासाठी, ते वापरण्यासाठी आणि ग्रीडला अतिरिक्त वीज विकण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

सात वर्षांपासून सुरू असलेल्या एलईडी दिवे  वितरण योजनेबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली, ते म्हणाले, यामुळे दरवर्षी  220 अब्ज युनिट्सपेक्षा जास्त विजेची बचत  आणि 180 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी  करण्यात मदत झाली आहे. तसेच, राष्ट्रीय  हायड्रोजन अभियानाचे  उद्दिष्ट हरित हायड्रोजनचा वापर करणे हे  आहे. त्यांनी टेरी  सारख्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना हरित  हायड्रोजन क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी व्यापक संशोधन करण्यासाठी  प्रोत्साहित केले. जगाच्या भूभागाच्या 2.4% क्षेत्र असलेल्या भारतामध्ये जगातील प्रजातींपैकी सुमारे 8% प्रजाती आहेत. पंतप्रधान म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला महान  देश आहे आणि या पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

संरक्षित क्षेत्र नेटवर्कच्या बळकटीकरणासंबंधी प्रयत्नांबाबत बोलताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेसारख्या संस्थांनी  भारताच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय मान्यता दिल्याचे सांगितले. जैवविविधतेच्या प्रभावी संवर्धनासाठी हरियाणातील अरवली जैवविविधता उद्यान हे O.E.C.M म्हणून घोषित केले जात आहे. भारतातील  आणखी दोन पाणथळ जागा रामसर स्थळ  म्हणून घोषित केल्यामुळे  भारतात आता 1 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त परिसरात  49 रामसर स्थळे  आहेत.

निकृष्ट जमीन पूर्ववत  करणे हे मुख्य लक्षित क्षेत्रांपैकी एक असून  2015 पासून 11.5 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमीन पूर्ववत केली आहे. “आपण बॉन चॅलेंज  (Bonn Challenge) अंतर्गत जमीन ऱ्हास तटस्थतेची  राष्ट्रीय वचनबद्धता साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. U.N.F आणि Triple C अंतर्गत आपल्या सर्व वचनबद्धता पूर्ण करण्यावर आमचा ठाम विश्वास आहे. ग्लासगो येथे कॉप -26 परिषदेदरम्यान आपण आपल्या महत्त्वाकांक्षा मांडल्या आहेत”, असे मोदी म्हणाले.

हवामान न्यायाद्वारेच पर्यावरणीय शाश्वतता  साध्य होऊ शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले की, आगामी वीस वर्षांत भारतातील लोकांच्या ऊर्जेची गरज जवळपास दुप्पट होण्याची शक्यता आहे. “ही उर्जा नाकारणे म्हणजे लाखो लोकांचे जीवन नाकारणे आहे.  यशस्वी हवामान कृतींसाठी देखील पुरेसा वित्तपुरवठा आवश्यक आहे. यासाठी विकसित देशांनी वित्त आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करणे आवश्यक आहे”, यावर त्यांनी भर दिला.

शाश्वत जागतिक समानतेसाठी  समन्वित कृती आवश्यक आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. “आपल्या प्रयत्नांनी हे परस्पर अवलंबित्व  ओळखले आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून ''एक सूर्य, एक जग, एक ग्रीड'' हे आपले उद्दिष्ट आहे. सर्वत्र जागतिक ग्रिडमधून स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. हाच ''संपूर्ण जागतिक '' दृष्टीकोन आहे ज्यात भारताची मूल्ये महत्वाची आहेत” असे  त्यांनी स्पष्ट केले.

आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडी(C.D.R.I.)  आणि  ''इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलिएंट आयलंड स्टेट्स'' यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातूनआपत्ती प्रवण क्षेत्रांची समस्या दूर करण्यात आली आहे. बेटांवरील राज्ये सर्वात असुरक्षित आहेतआणि त्यामुळे त्यांना तातडीने संरक्षणाची गरज आहे,असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी LIFE च्या दोन उपक्रमांचा  -लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट  आणि प्रो प्लॅनेट पीपल (3-Ps) पुनरुच्चार केला. या जागतिक आघाडी जागतिक समानता सुधारण्यासाठी आपल्या पर्यावरणीय प्रयत्नांचा पाया रचतील असे ते म्हणाले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
A big step forward in US-India defence ties

Media Coverage

A big step forward in US-India defence ties
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 जून 2023
June 04, 2023
शेअर करा
 
Comments

Citizens Appreciate India’s Move Towards Prosperity and Inclusion with the Modi Govt.