पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

‘छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजी दास टंडन यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. आपण एक आदरणीय व्यक्तिमत्व गमावले आहे ज्यांचे समाजाप्रती योगदान कायम स्मरणात राहील. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांच्या दु:खात मी सहभागी आहे. बलरामजी दास टंडन यांनी पंजाबमध्ये शांतता आणि समृद्धी नांदावी यासाठी अनेक दशके व्यतीत केली. उद्योग आणि कामगार कल्याण या क्षेत्रांबाबत त्यांना अधिक आपुलकी होती. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा राज्याला फायदा झाला. आणीबाणीला विरोध करताना त्यांनी दाखवलेले धैर्य कायम स्मरणात राहील,’ असे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे,

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India clears a major nuclear milestone as Kalpakkam fast breeder reactor turns 'critical'

Media Coverage

India clears a major nuclear milestone as Kalpakkam fast breeder reactor turns 'critical'
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 एप्रिल 2026
April 07, 2026

Aatmanirbhar Dreams Delivered: PM Modi’s Vision Turns Self-Reliance into Record Reality Across Defence, Energy & Nation-Building