हांगझाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा 2022 मध्ये दिव्या थडीगोल, ईशा सिंग आणि पलक यांच्या संघाने 10 मीटर एअर पिस्तूल (पिस्टल) प्रकारातील सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स समाजमाध्यम मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी प्रकारात भारताच्या खाती आणखी एक पदक! 10 मीटर एअर पिस्टल प्रकारातील सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल दिव्या थडीगोल, ईशा सिंग आणि पलक यांचे हार्दिक अभिनंदन. आगामी स्पर्धांतील यशासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचे हे यश उदयोन्मुख क्रीडापटूंसाठी प्रेरणादायक ठरेल.”
Another medal in Shooting at the Asian Games!
— Narendra Modi (@narendramodi) September 29, 2023
Congratulations to Divya Thadigol, Esha Singh and Palak on winning a Silver Medal in the 10m Air Pistol Women's team event. Best wishes to them for their future endeavours. Their success will motivate several upcoming sportspersons. pic.twitter.com/clQrQMgbpE


