आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.अनेक योगसाधकांसोबत अनेकविध योगासने करण्यात से ही सामील झाले. योगाने सर्वांना जोडले असल्याचे सांगून, "योग सर्वांसाठी आहे, तो सीमांच्या, पार्श्वभूमीच्या, वय किंवा क्षमता अशा सर्व बंधांच्या पलीकडे आहे," असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

























