राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन कोडे मोहीम 2023 (NICE-23) हे तरुणांसाठी विशेषतः कोणी सोडवण्याची आवड असणाऱ्यांसाठी आकर्षण ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या ट्विटर मालिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,
"युवकांना, विशेषतः कोडे सोडवण्यात रस असणाऱ्यांना आवडेल अशीच ही गोष्ट आहे."
This is something that would interest youngsters, particularly crossword enthusiasts. https://t.co/MuST3NIOLS
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2023


