अमेरिकेचे भारतातले नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी सर्जियो गोर यांना त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा कार्यकाळ भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे;
“ अमेरिकेचे भारतातले नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांचे स्वागत करून आनंद झाला. मला विश्वास आहे की त्यांचा कार्यकाळ भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल.
@SergioGor”
Glad to receive Mr. Sergio Gor, Ambassador-designate of the US to India. I’m confident that his tenure will further strengthen the India–US Comprehensive Global Strategic Partnership.@SergioGor pic.twitter.com/WSzsPxrJXv
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2025


