मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील नवीन भव्य वस्त्रोद्योग पार्क "मेक इन इंडिया" धोरणाला बळकटी प्रदान करेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या पार्कमुळे राज्याच्या विकासाचीही नवी दारे खुली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या ट्विटला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील हे भव्य वस्त्रोद्योग पार्क देशाच्या "मेक इन इंडिया" उपक्रमाला अधिक बळकट करेल, तसेच यामुळे युवकांसाठी रोजगारासह राज्यात विकासाची नवीन दारेही खुली होतील.”
#PragatiKaPMMitra"
मध्य प्रदेश के धार जिले में इस मेगा टेक्सटाइल पार्क से जहां मेक इन इंडिया की हमारी पहल को और मजबूती मिलेगी, वहीं युवाओं के लिए रोजगार के साथ-साथ राज्य में विकास के नए द्वार खुलेंगे। #PragatiKaPMMitra https://t.co/DsFAzHGvsw
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2023


