राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीए सरकारच्या काळात गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला आहे. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे, असे मोदी यांनीसांगितले.
'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे, हे मोदी यांनी अधोरेखित केले.
आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे, असे मोदी यांनी सांगितले. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत, असे मोदी म्हणाले. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
या अनुषंगाने, मोदी यांनी नागरिकांना NaMo अॅपद्वारे भारताच्या या परिवर्तनीय प्रवासाचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. या अॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण यासह अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे.
या शिवाय, NaMo अॅप आणि अधिकृत वेबसाइटवर व्हिडिओ, माहितीचित्रे आणि लेख यांसारख्या आकर्षक स्वरूपांत भारताच्या ‘विकास यात्रेचे सादरीकरण करण्यात आले आहे, नागरिकांनी हे नक्कीच पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले की,
"सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट भर !
140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे.
'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत . आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे.
आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
NaMo अॅपच्या माध्यमातून सरकारच्या परिवर्तनकारी प्रवासाची माहिती घेता येईल, अॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण आणि अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे. नागरिकांनी हे नक्कीच पाहावे.
A clear focus on good governance and transformation!
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2025
Powered by the blessings and collective participation of 140 crore Indians, India has witnessed rapid transformations across diverse sectors.
Guided by the principle of ‘Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas, Sabka… pic.twitter.com/bCC4MJP3Ii
"The last eleven years have brought many positive changes and boosted ‘Ease of Living.’
The NaMo App takes you through this transformative journey in an innovative manner, through interactive games, quizzes, surveys and other such formats that inform, engage and inspire.
Do have a look…
11YearsOfSeva"
The last eleven years have brought many positive changes and boosted ‘Ease of Living.’
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2025
The NaMo App takes you through this transformative journey in an innovative manner, through interactive games, quizzes, surveys and other such formats that inform, engage and inspire.
Do…
"India’s Vikas Yatra, showcased through interesting videos, infographics, articles and more on the NaMo App... Do explore.
narendramodi.in/vikasyatra2025
11YearsOfSeva"
India’s Vikas Yatra, showcased through interesting videos, infographics, articles and more on the NaMo App... Do explore. https://t.co/VdFMHo1pNH#11YearsOfSeva
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2025
" बीते 11 वर्षों में हमारी सरकार की हर योजना के केंद्र में गरीब भाई-बहनों के साथ ही जन-जन का कल्याण सुनिश्चित करना रहा है। उज्ज्वला हो या पीएम आवास, आयुष्मान भारत हो या भारतीय जनऔषधि या फिर पीएम किसान सम्मान निधि, इन सभी योजनाओं ने देशवासियों की उम्मीदों को नए पंख दिए हैं। हमने इस दौरान पूरी निष्ठा और सेवाभाव के साथ लोगों का जीवन आसान बनाने के लिए हरसंभव प्रयास किया है।"
#11YearsOfSeva
बीते 11 वर्षों में हमारी सरकार की हर योजना के केंद्र में गरीब भाई-बहनों के साथ ही जन-जन का कल्याण सुनिश्चित करना रहा है। उज्ज्वला हो या पीएम आवास, आयुष्मान भारत हो या भारतीय जनऔषधि या फिर पीएम किसान सम्मान निधि, इन सभी योजनाओं ने देशवासियों की उम्मीदों को नए पंख दिए हैं। हमने इस… pic.twitter.com/I4NFsPYBUP
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2025


