आम्हाला आमच्या सामूहिक यशाचा अभिमान आहे पण त्याच वेळी, आम्ही आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत: पंतप्रधान
गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता-‘Ease of Living’ मध्येही वाढ झाली आहे: पंतप्रधान
पंतप्रधानांकडून नागरिकांना NaMo अ‍ॅपद्वारे भारताच्या परिवर्तनीय प्रवासाचा शोध घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीए सरकारच्या काळात गेल्या अकरा वर्षांत भारतात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाश टाकला आहे. 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे, असे मोदी यांनीसांगितले.

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे, हे मोदी यांनी अधोरेखित केले.

आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे, असे मोदी यांनी सांगितले. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत, असे मोदी म्हणाले. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.  

या अनुषंगाने, मोदी यांनी नागरिकांना NaMo अ‍ॅपद्वारे भारताच्या या परिवर्तनीय प्रवासाचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. या अ‍ॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण यासह अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे.

या शिवाय, NaMo अ‍ॅप आणि अधिकृत वेबसाइटवर व्हिडिओ, माहितीचित्रे आणि लेख यांसारख्या आकर्षक स्वरूपांत भारताच्या ‘विकास यात्रेचे सादरीकरण करण्यात आले आहे, नागरिकांनी हे नक्कीच पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले की, 

"सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट भर !

140 कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे सुशासन आणि परिवर्तनावर स्पष्ट लक्ष केंद्रित केल्याने विविध क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली आहे. 

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या तत्त्वाचे मार्गदर्शन घेत, एनडीए सरकारने वेग, व्याप्ती आणि संवेदनशीलतेने अभूतपूर्व बदल घडवून आणले आहेत . आर्थिक विकासापासून ते सामाजिक उत्थानापर्यंत, सरकारने लोककेंद्रित, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिले आहे. 

आजचा भारत केवळ सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोन्मेष यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर एक प्रभावशाली आवाज बनला आहे. आपल्या सामूहिक यशाचा आपल्याला अभिमान आहे, मात्र त्याच वेळी आपण आशा, आत्मविश्वास आणि नव्या निर्धाराने विकसित भारत घडवण्यासाठी पुढे जात आहोत. गेल्या अकरा वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले असून जीवन सुलभता- ‘Ease of Living’ मध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. 

NaMo अ‍ॅपच्या माध्यमातून सरकारच्या परिवर्तनकारी प्रवासाची माहिती घेता येईल, अ‍ॅपमध्ये सरकारची कामगिरी खेळ, प्रश्नमंजुषा, सर्वेक्षण आणि अन्य माहिती देण्यात आली असून, त्यात माहितीपूर्ण तसेच प्रेरणा देणाऱ्या घटकांचा समावेश आहे. नागरिकांनी हे नक्कीच पाहावे.

 

"The last eleven years have brought many positive changes and boosted ‘Ease of Living.’

The NaMo App takes you through this transformative journey in an innovative manner, through interactive games, quizzes, surveys and other such formats that inform, engage and inspire.

Do have a look…

nm-4.com/11yearsofseva

11YearsOfSeva"

 

"India’s Vikas Yatra, showcased through interesting videos, infographics, articles and more on the NaMo App... Do explore.

narendramodi.in/vikasyatra2025

11YearsOfSeva"

 

" बीते 11 वर्षों में हमारी सरकार की हर योजना के केंद्र में गरीब भाई-बहनों के साथ ही जन-जन का कल्याण सुनिश्चित करना रहा है। उज्ज्वला हो या पीएम आवास, आयुष्मान भारत हो या भारतीय जनऔषधि या फिर पीएम किसान सम्मान निधि, इन सभी योजनाओं ने देशवासियों की उम्मीदों को नए पंख दिए हैं। हमने इस दौरान पूरी निष्ठा और सेवाभाव के साथ लोगों का जीवन आसान बनाने के लिए हरसंभव प्रयास किया है।"
#11YearsOfSeva

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba

Media Coverage

Indian Railways clears ₹755-crore project to build third line between Champa and Korba
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister hails India-UK Comprehensive Economic and Trade Agreement as a historic milestone for bilateral relations
June 17, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed delight that the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement will enter into force on 15 July 2026.

The Prime Minister said that the agreement will significantly boost bilateral trade and investment.

Shri Modi stated that the agreement will unlock numerous opportunities for Indian farmers, workers, MSMEs, startups and innovators and contribute meaningfully to the realisation of Viksit Bharat 2047.

The Prime Minister noted that both he and UK Prime Minister Keir Starmer, who are in Evian for the G7 Summit, are very happy with the significant momentum being added to India-UK economic ties.

The Prime Minister wrote on X;

“A historic milestone for India-UK relations.

Delighted to note that the India-UK Comprehensive Economic and Trade Agreement will enter into force on 15th July 2026.

This agreement will significantly boost our bilateral trade and investment.

It will also unlock numerous opportunities for Indian farmers, workers, MSMEs, startups and innovators and contribute meaningfully to the realisation of Viksit Bharat 2047.

Both PM Starmer and I, who are in Evian for the G7 Summit, are naturally very happy with the significant momentum being added to our economic ties.

@Keir_Starmer”