विचार खाद्य

Published By : Admin | September 16, 2016 | 23:56 IST
शेअर करा
 
Comments

भारताच्या पंतप्रधानांना खायला काय आवडते ? असा प्रश्न विचारला जाणे  स्वाभाविक आहे. ते खाद्यप्रेमी आहेत का ...

     याबाबत नरेंद्र मोदी यांनी स्वत:च माहिती दिली.

     “सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या लोकांचे जगणे फार अनियमित असते. त्यामुळे जर एखाद्याला सार्वजनिक आयुष्यात सक्रीय राहायचे असेल  तर त्याची पचनशक्ती उत्तम असली पाहिजे.

     35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत विविध क्षमतांच्या संघटनांसाठी काम करतांना मला देशभरात प्रवास करावा लागला आणि मिळेल ते अन्न ग्रहण करावे लागले.  मी कोणालाही माझ्यासाठी काही खास जेवण बनवायला सांगितले नाही.

     मला खिचडी खूप आवडते. पण जे मिळेल ते मी खातो.

     माझे आरोग्य हे माझ्या देशासाठी ओझे होऊ नये असे मला वाटते.  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला निरोगी राहायचे आहे”.

     पंतप्रधानांच्या भूमिकेत गेल्यानंतर खूप जास्त प्रवास करावा लागतो आणि अनेक भोजन समारंभांना उपस्थित राहावे लागते. प्रत्येक भोजन समारंभांत स्थानिक शाकाहारी भोजन पंतप्रधानांना आवडते. मात्र मद्यार्कयुक्त पेयाऐवजी ते पाणी किंवा रस घेणे पसंत करतात.

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
Using its Role as G-20 Chair, How India Has Become Voice of 'Unheard Global South'

Media Coverage

Using its Role as G-20 Chair, How India Has Become Voice of 'Unheard Global South'
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
स्टार्ट- अप पंतप्रधान
September 07, 2022
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळालेली कोणीही व्यक्ती त्यांच्याकडे एक प्रेरणादायी नेता आणि उत्सुक श्रोता म्हणून पाहते. OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे मतही यापेक्षा निराळे नाही. रितेशला पंतप्रधान मोदींशी ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीबद्दल चर्चा करण्याची संधी मिळाली होती. पंतप्रधानांशी झालेल्या अगदी थोडक्या संभाषणातूनही त्यांना व्यवसायाचे संपूर्ण नवीन मॉडेल तयार करण्यात मदत झाली.

पंतप्रधान मोदी हे अशी व्यक्ती आहेत, ज्यांना केवळ एखादी गोष्ट ढोबळमानाने पाहिल्यानंतरही त्यातील बारकावे पटकन लक्षात येतात  एवढेच नव्हे तर ग्राउंड लेव्हलवर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर चर्चा करू शकतात, असे रितेशने एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे. . 

पंतप्रधानांनी दिलेले एक उदाहरण त्यांनी शेअर केले. पीएम मोदींच्या विधानाचा दाखला देताना रितेश म्हणतात, “भारत ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. आपल्या देशात खूप शेतकरी आहेत. त्यांचे उत्पन्न काही वेळा कमी जास्त होऊ शकते. दुसरीकडे, असे लोक आहेत ज्यांना खेड्यात जायचे आहे, त्यांना तिथे जाऊन राहायचे आहे आणि तिथल्या लोकजीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. यातून काही शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा शाश्वत स्रोत मिळावा आणि शहरी रहिवाशांना खरोखर खेड्यातील जीवन म्हणजे काय हे पाहता यावे यासाठी तुम्ही ग्रामीण पर्यटनाचा उपक्रम का करून पहात नाही?”

ग्रामीण पर्यटनाबद्दल पंतप्रधानांशी झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या संभाषणाची परिणती अनेक शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांना शाश्वत उत्पन्न मिळविण्याच्या संधीत कशी झाली याबद्दल रितेशने सविस्तर सांगितले आहे. एखाद्या विषयाच्या प्रचंड खोलीचे आणि रुंदीचे आकलन असण्याच्या पंतप्रधानांकडे असलेल्या क्षमतेमुळेच पंतप्रधान मोदींना ‘स्टार्ट-अप पंतप्रधान’ बनले असल्याकडे रितेश लक्ष वेधतात. 

रितेश पुढे सांगतात की केवळ प्रवास आणि पर्यटनच नाही तर इतर कोणत्याही उद्योगाशी संबंधित विषयांवर समान पातळीवरून चर्चा करण्याइतकी पंतप्रधान मोदींकडे क्षमता आणि त्या विषयाचे खोलवर ज्ञान आहे. “मी त्यांना डेटा सेंटर्सच्या विस्ताराविषयी, आपण सौरपासून इथेनॉलपर्यंतच्या गोष्टींचा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी कसा वापर करू शकतो, पॅनल्स भारतात तयार करता याव्यात यासाठी सर्व कच्च्या मालाची आवश्यकता आहे, पीएलआय योजनेचा कंपनीला कसा फायदा होऊ शकतो अशा विविध विषयांवर चर्चा करताना पाहिले आहे .…..जेव्हा आपण पायाभूत सुविधांबद्दल बोलतो तेव्हा आपण स्वत:ला रस्ते, रेल्वे आणि महामार्ग एवढेच  मर्यादित ठेवतो, परंतु जेव्हा जेव्हा मी त्यांना उद्योग प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून भेटलो आहे तेव्हा मी त्यांना ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर चर्चा करताना पाहिले आहे. भारत, या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सर्वात मोठा एकमेव देश असेल, याबद्दल लोकांना कदाचित फार थोडी माहिती असेल. भारत हा ड्रोन निर्मिती आणि त्यासंबंधीच्या संशोधन आणि नवकल्पनांचा केंद्रबिंदू बनला आहे… या प्रत्येक उद्योगाबद्दल एवढी सखोल माहिती असणे  माझ्या दृष्टीने अवाक करणारे आहे पण त्यामुळेच या उद्योगांची झपाट्याने वाढ होत आहे.”

रितेश म्हणतात, पंतप्रधान मोदी हे “उत्कृट श्रोते” देखील आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील एक प्रसंग त्यांनी सांगितला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते याची आठवण त्यांनी सांगितली. पुन्हा एकदा पंतप्रधानांचा हवाला देत ते सांगतात, "जर पर्यटनाचा विस्तार करायचा असेल तर आपण मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ज्याद्वारे उद्योगांना त्याचा लाभ घेता येईल." रितेश पुढे म्हणाले की गुजरातमधील केवडिया हे या कल्पनेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील आकर्षणांमुळे हॉटेल उद्योगाची भरभराट होण्यास मदत झाली आहे. “पायाभूत सुविधांबद्दल सुमारे पाच, दहा, पंधरा वर्षांपर्यंतची दूरदृष्टी असलेले पंतप्रधान मोदी मला दीर्घकालीन  सुधारणावादी आणि मूल्य निर्माता म्हणून अधिक आकर्षक वाटतात”, असे रितेश नमूद करतात . 

आणखी पुढे रितेश म्हणतात की, पीएम मोदींमध्ये उद्योजकतेचे अनेक गुण आहेत. पंतप्रधान मोदी प्रभावाच्या बाबतीत मोठा विचार करतात परंतु तसे करण्यापूर्वी ते त्याचा छोट्या प्रमाणात प्रयोग करून पाहतात. मोठ्या उपक्रमांची आखणी करून आणि त्याची त्यानुसार अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने बारकाईने त्याचा पाठपुरावा करत राहण्याची त्यांच्यामध्ये विलक्षण क्षमता आहे.” असे ते म्हणतात. “आपल्या देशात एक नेता आहे जो म्हणतो की आपण थोडक्याने समाधानी होणारे नाहीत. आपण एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेला देश आहोत ज्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम बनण्याची आकांक्षा आणि प्रेरणा आहे.” अशी प्रतिक्रियाही OYO चे संस्थापक व्यक्त करतात.

अस्वीकरण:

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांनी सांगितलेले अनुभव/मत/विश्लेषण आणि त्यांचा लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम सांगणाऱ्या कथा संकलित करण्याचा हा एक प्रयत्न आहे.