The total estimated cost of the projects is Rs 23,437 crore and will be completed up to 2030-31

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 23,437 कोटी रुपये एकूण खर्चाच्या 3 (तीन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

  1. नागदा – मथुरा तिसरी आणि चौथी लाईन
  2. गुंटकल – वाडी तिसरी आणि चौथी लाईन
  3. बरहवाल – सीतापूर तिसरी आणि चौथी लाईन

वाढलेल्या मार्ग क्षमतेमुळे वाहतूक सुलभ होईल, परिणामी भारतीय रेल्वेची परिचालन कार्यक्षमता आणि सेवेची विश्वसनीयता सुधारेल. हे बहु-मार्गी प्रस्ताव कामकाज सुव्यवस्थित करण्यास आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास सज्ज आहेत. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'नव्या भारताच्या दृष्टिकोना'शी सुसंगत आहेत, जो या भागाच्या सर्वांगीण विकासाद्वारे तेथील लोकांना 'आत्मनिर्भर' बनवेल आणि त्यांच्या रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी वाढवेल. 

हे प्रकल्प पीएम-गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅननुसार नियोजित असून एकात्मिक नियोजन आणि भागधारकांशी विचारविनिमय करून बहुविध वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे लोकांच्या, वस्तूंच्या आणि सेवांच्या वाहतुकीसाठी अखंड संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल.

मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील 19 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 3 (तीन) प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेचे सध्याचे जाळे सुमारे 901 किलोमीटरने वाढेल.

प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे अंदाजे 83 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 4,161 गावांचा संचारसंपर्क वाढेल. 

प्रस्तावित क्षमता वाढीमुळे महांकाळेश्वर, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, कुनो राष्ट्रीय उद्यान, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, मथुरा, वृंदावन, मंत्रालयम (श्री राघवेंद्र स्वामी मठ), श्री नेट्टीकांती आंजनेय स्वामी वारी मंदिर (कासापुरम ), श्यामनाथ मंदिर, नैमिषारण्य (नीमसर), यासह देशभरातील अनेक प्रमुख पर्यटन स्थळांचा रेल्वे संपर्क सुधारेल. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance

Media Coverage

India’s pharmaceutical sector records transformative growth over 12 years, strengthening affordable healthcare and self-reliance
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 19 जून 2026
June 19, 2026

Appreciation for India’s Domestic Growth and Rising Global Influence under PM Modi’s Leadership