पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने, आज 2026-27 च्या विपणन हंगामातील कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतींना (एमएसपी) मान्यता दिली आहे.

2026-27 या वर्षातील हंगामासाठी कच्च्या तागाची (टीडी-3 ग्रेड) किमान आधारभूत किंमत 5,925 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना सरासरी उत्पादन खर्चापेक्षा 61.8 टक्के अधिक परतावा मिळेल. 2026-27 च्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागासाठी जाहीर केलेली ही किमान आधारभूत किंमत; 2018-19 च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत, निश्चित करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे.

2026-27 या वर्षाच्या विपणन हंगामासाठी कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत मागील  वर्षीच्या (2025-26) विपणन हंगामाच्या तुलनेत प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढली आहे. सरकारने निश्चित केलेली कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत 2014-15 मधे 2400 रुपये प्रति क्विंटल होती ती 2026-27 मध्ये 5,925 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवली आहे, त्यामुळे या किंमतीत तुलनेत प्रति क्विंटल 3,525 रुपये (अडीच पट) वाढ झाली आहे.

2014-15 ते 2025-26 या कालावधीत ताग उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली किमान आधारभूत किंमत 1342 कोटी रुपये होती, तर 2004-05 ते 2013-14 या कालावधीत हीच किंमत 441 कोटी रुपये इतकी देण्यात आली होती.

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जेसीआय) ही कंपनी ही किंमत निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून सुरूच राहील आणि याच्या कार्यवाहीत कोणतेही  नुकसान, झाल्यास, केंद्र सरकारकडून त्याची संपूर्णपणे भरपाई केली जाईल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features

Media Coverage

In 2019, India launched its first Vande Bharat Express; seven years later came the sleeper version, and Railways now plans 260 Vande sleeper rakes with world-class features
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 सप्टेंबर 2026
September 03, 2026

A- Rating to Third-Largest Wind Producer: How Modi’s Policies Are Rewriting India’s Global Rank