शेअर करा
 
Comments
Bihar is blessed with both 'Gyaan' and 'Ganga.' This land has a legacy that is unique: PM
From conventional teaching, our universities need to move towards innovative learning: PM Modi
Living in an era of globalisation, we need to understand the changing trends across the world and the increased spirit of competitiveness: PM
A nation seen as a land of snake charmers has distinguished itself in the IT sector: PM Modi
India is a youthful nation, blessed with youthful aspirations. Our youngsters can do a lot for the nation and the world: PM

पाटणा विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. पाटणा विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणे हा आपला सन्मान असल्याचे पंतप्रधान म्हणाले. बिहारच्या भूमीला आपले नमन. या विद्यापीठाने असे विद्यार्थी घडवले आहेत, ज्यांनी राष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

राज्यांमध्ये पाहिले तर, नागरी सेवांमध्ये सर्वोच्च स्तरावर, असणाऱ्या व्यक्तींनी,पाटणा विद्यापीठात अध्ययन केल्याचे आपल्याला आढळून आल्याचे ते म्हणाले. दिल्लीमध्ये  आपला अनेक अधिकाऱ्यांसमवेत संवाद झाला त्यापैकी बरेच जण पाटणा विद्यापीठाचे होते असे त्यांनी सांगितले.

बिहारच्या प्रगतीसाठीची,  मुख्यमंत्री नितीशकुमार,यांची कटिबद्धता, प्रशंसनीय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या पूर्वेकडच्या भागाच्या विकासाला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

बिहारला ‘ज्ञान’ आणि ‘गंगा’ या दोन्हींचा आशीर्वाद लाभला आहे. अनोखा वारसा लाभलेली ही  भूमी आहे. पारंपरिक अध्यापनाकडून आपल्या विद्यापीठांनी आता कल्पक आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाकडे वळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जागतिकीकरणाच्या या काळात, जगभरातला बदलता कल आणि वाढती स्पर्धात्मकता आपण जाणून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात, जगात, भारताला आपले स्थान निर्माण करावे लागेल असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेच्या समस्यांवर कल्पक तोडगा काढण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी, विचारांना चालना द्यावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. घेतलेले शिक्षण उपयोगात आणत आणि स्टार्ट अपच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी बरेच काही करता येऊ शकते असे ते म्हणाले.

पाटणा विद्यापीठातून, विमानतळाकडे जाताना, पंतप्रधानांनी, बिहारची समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी, बिहारचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर त्यांच्या समवेत उपस्थित होते.

 

 

 

 

Click here to read the full text speech

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
All citizens will get digital health ID: PM Modi

Media Coverage

All citizens will get digital health ID: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
एस. सेल्वागणपती यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
September 28, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी,  एस. सेल्वागणपती यांची पुदुच्चेरीमधून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

"आपल्या पक्षाला पुदुच्चेरीमधून एस. सेल्वागणपतीजी यांच्या रुपाने राज्यसभेचे पहिले खासदार मिळाले आहेत ही प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पुदुच्चेरीच्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आदरास पात्र आहे. आम्ही पुदुच्चेरीच्या प्रगतीसाठी काम करत राहू."