मी 21-23 नोव्हेंबर 2025 दरम्यान दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचा दौरा करत आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या 20 व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.
ही एक विशेष शिखर परिषद असेल कारण ती आफ्रिकेत होणारी पहिली जी-20 शिखर परिषद असेल. 2023 मध्ये भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आफ्रिकी महासंघ जी- 20 चा सदस्य झाला होता.
ही शिखर परिषद प्रमुख जागतिक मुद्यांवर चर्चा करण्याची एक संधी असेल. या वर्षीच्या जी-20 ची संकल्पना 'एकता, समानता आणि शाश्वतता' अशी आहे, ज्याद्वारे दक्षिण आफ्रिकेने भारतातील नवी दिल्ली आणि ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथे झालेल्या मागील शिखर परिषदांमधील निष्कर्ष पुढे नेले आहेत. 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' या आपल्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने मी या शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडणार आहे.
मी भागीदार देशांच्या नेत्यांशी संवाद साधण्यास आणि शिखर परिषदेच्या दरम्यान होणाऱ्या सहाव्या आयबीएसए शिखर परिषदेत सहभागी होण्यास उत्सुक आहे.
तसेच या भेटीदरम्यान, मी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधण्यासही उत्सुक आहे. हा भारताबाहेरचा हा सर्वात मोठ्या भारतीय प्रवासी समुदायांपैकी एक आहे.


