पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
उभय नेत्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण गतिशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
उभय नेत्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला तसेच सर्व प्रकारच्या आणि स्वरुपाच्या दहशतवादाबद्दल शून्य-सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार केला.
त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी गाझा शांतता योजनेच्या लवकर अंमलबजावणीसह या प्रदेशात न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.
उभय नेत्यांनी परस्पर संपर्कात राहण्याचे मान्य केले.


