“भाविकांनी या प्रकल्पामध्ये अध्यात्मिक उपासनेच्या तसेच समाज सेवेच्या भावनेने सहभागी झाले पाहिजे”
सेंद्रिय शेती तसेच नव्या पीक पद्धतींचा स्वीकार करण्याचे केले आवाहन

नमस्ते,

कसे आहात सगळे?

वास्तविक मला प्रत्यक्ष या कार्यक्रमाला यायचं होतं. जर मी प्रत्यक्षात येऊ शकलो असतो तर, तुम्हा सर्वांची भेट घेता आली असती. तथापि, वेळेअभावी येणे शक्य झाले नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या युगातल्या  या तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी मला या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून जो बृहद सेवा मंदिर प्रकल्प साकार होत आहे, या कार्याचे माझ्या दृष्टीने बहुआयामी महत्व आहे.

लालकिल्ल्याच्या बुरूजावरून दिलेल्या भाषणामध्ये मी ‘सबका प्रयास’ म्हणजेच सर्वांच्या प्रयत्नांतून केलेले कार्य याविषयी बोललो होतो. अगदी त्याचप्रमाणे माँ उमिया धामच्या विकास कार्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. यासाठी माँ उमिया सेवा संकूलाबरोबर सर्वजण जोडले जाणार आहेत. उमिया सेवा संकूलाने धार्मिक हेतू किंवा आध्यात्मिक हेतूपेक्षाही समाजसेवेचे उद्दिष्ट निश्चित करून नवीन ध्येय साध्य केले पाहिजे. ‘‘नर करणी करे तो नारायण हो जाय’’  याचाच अर्थ असा आहे की, मनुष्याला कर्म करून देवत्व प्राप्त करता येते. असे आपल्याकडे म्हटले जाते. त्याचबरोबर आपल्याकडे असेही म्हणतात की, ‘‘जनसेवा हीच जग सेवा’’ म्हणजेच लोकांची सेवा करणे हे विश्वाची सेवा करण्याइतके चांगले कार्य आहे. प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे दर्शन होते, अशी भावना जपणारे आपण लोक आहोत. आणि म्हणूनच भावी तरूण पिढीला समाजाच्या सहकार्याने पुढची वाटचाल करायची आहे, यासाठी आपण तयार करायचे आहे, त्यासाठीचे नियोजन करायचे आहे. आणि त्यासाठी आपण जे प्रकल्प हाती घेतले आहेत, ते अतिशय कौतुकास्पद आहे. असे सेवा प्रकल्प उभारणे हे स्वागतार्ह पाऊल आहे. ‘माँ उमिया शरणम् मम’’ या मंत्राचा 51 कोटींचा जप  करण्याचे  आणि तो लिहिण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली आहे. हा मंत्रजप संकल्प स्वतःच एक ऊर्जेचा, चैतन्याचा झरा बनला आहे. आणि तुम्ही माँ उमियाला शरण जाऊन जनतेच्या सेवेचा मार्ग निवडला आहे, हे खूप चांगले आहे. यामध्ये आज सेवेची अनेक मोठमोठाली कामे सुरू करण्यात येत आहेत. माँ उमिया धाम विकास प्रकल्प म्हणजे सेवेची एक विशाल मोहीम आहे. या मोहिमेचे कार्य आगामी पिढ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात.

परंतु ज्यावेळी तुम्ही युवकांना विविध संधी उपलब्ध करून देत आहात,  तसेच त्यांच्यासाठी अनेक सुविधा निर्माण करीत आहात त्यावेळी  तुम्हा मंडळींना एक गोष्ट मला आवर्जुन सांगाविशी वाटते. याचे कारण म्हणजे, आताचे युग हे कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या संस्थेच्या प्रत्येक कार्याला युवकांच्या कौशल्य विकसनासाठी पैलूशी जोडले पाहिजे, असे मला वाटते. अर्थात, तुम्ही या गोष्टीचा विचार नक्कीच केलाही असणार आहे. आजच्या काळातही कौशल्याचे महत्व वाढवणे गरजेचे आहे.  आपल्या जुन्या काळामध्ये जी कौटुंबिक रचना होती, त्यामध्ये आपल्या परिवाराकडे असलेल्या कौशल्याचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपविण्याला फार महत्व होते. आता एकूणच सामाजिक जडणघडणीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला आहे.  त्यामुळे परिवारात असलेल्या कौशल्याचा वारसा पुढे चालविला जावा, यासाठी एक आवश्यक यंत्रणा- कार्यपद्धती निर्माण करण्याचे कामही आपल्यालाच करावे लागणार आहे.  आता देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. ज्यावेळी मला गुजरातमध्ये तुमची सेवा करण्याची संधी तुम्ही मंडळींनी दिली होती, त्यावेळी आणि आता ज्यावेळी तुम्ही सर्वांनीच माझ्यावर देशाची सेवा करण्याचे कार्य सोपवले, त्यावेळी मी यापूर्वी जे म्हटले होते, त्याचे आज स्मरण करू देऊ  इच्छितो. ‘‘  आपण एक समाज म्हणून आपल्या देशाच्या उभारणीसाठी  काय योगदान देऊ शकतो, याचा एक निश्चित संकल्प तुम्ही करावा आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये हा संकल्प पूर्ण करावा, असे आवाहन मी केले होते.’’ आता देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. आणि देशाचा पंतप्रधान म्हणून मी वास्तवामध्ये तुमच्याकडे  आलो आहे. याविषयी आपण सर्वांनीच अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. अनेक बाबतीत सहकार्य असावे आणि विविध कार्यात तुमची  सहभागीता असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. विशेष म्हणजे तुम्ही सर्वांनी देशासाठी असे योगदान देण्यास सहर्ष संमतीही दिली आहे. 

आज मला उंझा इथे मागे काही वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाचे स्मरण होत आहे. माझ्या पक्के लक्षात आहे, ज्यावेळी मी ‘बेटी बचाव’’ मोहीम राबवत होतो, त्यावेळी मी एकदा उंझा येथे आलो होतो. तुम्हा सर्वांबरोबर अनेक विषयांवर चर्चा झाली होती. अनेक गोष्टी मी तुमच्याबरोबर सामायिक केल्या होत्या. उंझा हे माँ उमिया धामचे निवासस्थान आहे.  त्याचठिकाणी मुलींचा जन्मदर कमी असल्याचे आपल्या सर्वांच्या लक्षात आले होते. माँ उमियाच्या निवासस्थानी   मुलींचा जन्मदर कमी असणे म्हणजे एकप्रकारे कलंकच आहे, असेही मी म्हटले होते. आणि या परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे तुम्हा सर्वांकडून एक वचन मी घेतले होते. आज मी तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. कारण मुलींचा जन्मदर आणखी घटणार नाही, असे वचन देवून तुम्ही हे आव्हान स्वीकारले होते. त्यामुळे या भागातली परिस्थिती हळू हळू सुधारली. आणि आता उंझा येथे मुलांचा आणि मुलींचा जन्मदर जवळपास समान झाला आहे. समाजामध्ये हे परिवर्तन घडवून आणण्याची गरज होती, हे तुम्हालाही पटले होते. त्यामुळेच त्यानुसार तुम्ही जे काम केले, ते अतिशय चांगले झाले आहे.

याचबरोबर, मला आणखी एक स्मरण होते, ते म्हणजे, ‘सुजलाम् सुफलाम्’ योजने अंतर्गत नर्मदा नदीचे पाणी पुरवण्याचे काम सुरू झाले त्यावेळीच  मी उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना आणि त्याचबरोबर माँ उमियाच्या भक्तांना विशेष विनंती केली होती. नर्मदेचे भरपूर पाणी  जरी या भागात आता  पोहोचले असले तरीही आपण  पाण्याचे महत्व जाणले पाहिजे. ज्यांच्याकडे पाणी जास्त नाही, टंचाई आहे, त्यांच्या दृष्टीने ‘‘ जल एजे जीवन छे’’ म्हणजेच  जल हे जीवन आहे. ही आणखी एक घोषणा होऊ शकते. परंतु पाण्याविना आपण कसे संघर्षमय जीवन कंठले आहे, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. पाऊस पडलाच नाही, पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे आपली कितीतरी दिवस आणि वर्ष वाया गेली, याची वेदना आपण सर्वांनी अनुभवली आहे. त्यामुळे सर्वांनी पाणी बचतीचा संकल्प केला. उत्तर गुजरातमध्ये सर्वत्र ठिबक सिंचन पद्धत अवलंबली जावी, असा आग्रह माझा होता. विशेष म्हणजे, तुम्ही लोकांनी या गोष्टीचे स्वागत केले. अनेक भागामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने शेतीला पाणी दिले जाऊ लागले आणि त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत झाली तसेच पिकेही चांगली आली. 

अगदी याचप्रमाणे आपण भूमातेच्या आरोग्याविषयी चर्चा केली होती. यातूनच मृदा आरोग्य पत्रिका तयार करणारे गुजरात हे देशातले पहिले राज्य होते. आता संपूर्ण देशामध्ये मृदा आरोग्य पत्रिका तयार केली जात आहे. आपल्या भूमातेचे आरोग्य चांगले रहावे, मातीची वारंवार तपासणी व्हावी, मातीमध्ये काही दोष निर्माण झाले, मातीला काही आजार झाला, हवामानामुळे काही विशिष्ट घटकांची मातीला जरूरी असली तर या सर्व गरजा मृदा आरोग्य पत्रिकेमुळे आपल्याला समजतात. तथापि, भरघोस उत्पन्न घेण्याचा  लोभ असणे  आणि झटपट जास्त कमाईच्या हव्यास धरणे हा एक मानवी स्वभाव आहे. त्यामुळे अनेक जण भूमातेच्या आरोग्याची चिंता करीत नाहीत आणि अनेक प्रकारची रसायने, खते, औषधांचा वापर करीत आहेत.    

आज मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. आपण सर्वांनी माँ उमियाची सेवा करण्याचा संकल्प केला आहे, त्यामुळे आपण या भूमातेला काही विसरू शकत नाही.  आणि माँ उमियाच्या मुलांना भूमातेला विसरण्याचा अधिकारही नाही. माँ उमिया आणि भूमाता आपल्यासाठी समसमान आहेत. भूमाता आपल्यासाठी जीवन आहे आणि माँ उमिया ही आपली आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आग्रहपूर्वक सांगतो की, उत्तर गुजरातच्या शेतकरी बांधवांनी सेंद्रीय शेती सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. माँ उमियाच्या उपस्थितीमध्ये आपण सेंद्रीय शेती करण्याचार संकल्प करावा. याच सेंद्रीय शेतीला आता शून्य अंदाजपत्रक शेती असेही म्हटले जाते. मला ठाऊक आहे, आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असणार की, मोदीजींना तर शेतीतले काहीही समजत नाही. तरीही ते सल्ले मात्र देत राहतात. काही हरकत नाही, तुम्हा असे वाटले तरी! जर सेंद्रीय शेतीची माझी विनंती तुम्हाला अयोग्य वाटत असेल तर, मी आणखी एक वेगळा पर्याय देऊ इच्छितो. जर तुमच्याकडे  दोन एकर शेतजमीन असले तर त्यापैकी किमान एक एकरामध्ये सेंद्रीय शेती करण्याचा प्रयत्न करा.  आणि उर्वरित एक एकरामध्ये नेहमीप्रमाणेच पिके घ्या. हीच पद्धत आणखी एक वर्ष करून पहा. जर तुम्हाला ही पद्धत लाभदायक वाटली तर मग तुम्ही संपूर्ण दोन एकरामध्ये सेंद्रीय शेती करू शकता. यामुळे शेतीच्या खर्चामध्ये बचत होईल आणि आपल्या भूमातेला जणू नवसंजीवनी मिळेल. यामुळे तुमच्या हातून  आगामी पिढ्यांसाठी उत्तम काम होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. सेंद्रीय शेती पद्धत वैज्ञानिकदृष्टीने सिद्ध झाली आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी अमूल डेअरीने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये मी सेंद्रीय शेतीविषयी अगदी विस्ताराने चर्चा करणार आहे. आता तुम्हीही सेंद्रीय शेती म्हणजे काय हे, चांगले समजून घ्या. आणि या शेती पद्धतीचा स्वीकार करून माँ उमियाच्या आशीर्वादाने पुढची वाटचाल करावी.  माझ्या दृष्टीने एक महत्वाचा विषय म्हणजे, ‘‘सबका प्रयास’’, ‘‘ सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’’ आणि आता ‘‘ सबका प्रयास’’ !!

अगदी याच प्रमाणे , तुम्ही पाहिले असेल की, बनासकांठा भागामध्ये पीक घेण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. विविध नवीन कृषी उत्पादनांचा स्वीकार करण्यात आला आहे. कच्छ जिल्हा पहा. कच्छला पाणी मिळाले आहे आणि या जिल्ह्यात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यास प्रारंभ झाला आहे. आज कच्छच्या फळांची परदेशात निर्यात केली जात आहे. आपणही हे करू शकतो. मात्र तसा आपण विचार करायला हवा. म्हणूनच मी पुन्हा एकदा आग्रहपूर्वक सांगतो की, आज आपण सर्वांनी माँ उमियाच्या सेवेसाठी इतक्या मोठ्या कामांना प्रारंभ करीत आहात, ज्या पद्धतीने माँ उमियाचे सेवा करीत आहात, या सेवेचा संबंध माँ उमियाच्या भक्तीबरोबर जोडला गेला आहे. म्हणूनच माँ उमियाची सेवा करताना तुम्ही विचारशील व्हावे आणि या विश्वाची काळजी करावी. माँ उमियाच्या आशीर्वादाने आपल्या सध्याच्या पिढीला अधिक सक्षम बनविण्याबरोबरच त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आज जे काही नवनवीन प्रयत्न सुरू आहेत, ज्या नवीन योजना सुरू केल्या जात आहेत, त्या सर्व गोष्टींमुळे गुजरातच्या आणि राष्ट्राच्याही विकासामध्ये उल्लेखनीय योगदान दिले जाणार आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे.

ज्यावेळी राष्ट्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’’ साजरा करताना माँ उमियाच्या मंदिराच्या उभारणीचा उभारणीचा उत्सव साजरा करीत आहे, त्यावेळी आपण सर्वांनी मिळून अनेक नवीन संकल्पांसह पुढे जाणे आवश्यक आहे.

पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे , अगदी प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन. ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल, त्यावेळी आपण वैयक्तिक रितीने भेटूच. तसेच आपल्या कामाच्या प्रगतीविषयी चर्चाही करूया. आपण जरूर भेटू या.

जय उमिया माँ!!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Small towns emerge big growth driver for connected TV in India

Media Coverage

Small towns emerge big growth driver for connected TV in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates H.E. President Hakainde Hichilema on re-election as President of Zambia
August 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, has extended his heartiest congratulations to President H.E. Hakainde Hichilema on his re-election as the President of Zambia.

The Prime Minister said that India greatly values its multifaceted partnership with Zambia.

Shri Modi expressed his desire to work together with President Hakainde Hichilema to further strengthen the relations between India and Zambia under his leadership.

The Prime Minister said in a X post;

“Heartiest Congratulations to President Hakainde Hichilema on being re-elected as the President of Zambia.

India greatly values its multifaceted partnership with Zambia and I look forward to working together to further strengthen our relations under his leadership.

@HHichilema”