"जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींच्या संरक्षकांवर अवलंबून आहे"
"जगातील सर्वात असुरक्षित नागरिकांवर तुमची चर्चा केंद्रित करा"
"एक सर्वसमावेशक कार्यसूची तयार करूनच जागतिक आर्थिक नेतृत्व जगाचा विश्वास जिंकू शकते"
"भारताच्या जी 20 अध्यक्षतेची संकल्पना सर्वसमावेशक दृष्टीला प्रोत्साहन देते - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य"
"भारताने त्याच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये अत्यंत सुरक्षित, अत्यंत विश्वासार्ह आणि अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत"
"आमची डिजिटल पेमेंट प्रणाली विनामूल्य सार्वजनिक हित म्हणून विकसित केली गेली आहे"
"यूपीआय सारखी उदाहरणे इतर अनेक देशांसाठी देखील आदर्श ठरु शकतात"

महामहिम,

मी जी 20 अर्थमंत्र्यांचे आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांचे भारतात स्वागत करतो. तुमची बैठक ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील मंत्री-स्तरीय संवादाची पहिलीच बैठक आहे. फलदायी बैठकीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे. जग गंभीर आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तुम्ही जागतिक वित्त आणि अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करता. कोविड साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला या शतकात न भूतो न भविष्यती असा धक्का दिला आहे. अनेक देश, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था, अजूनही त्याच्या परिणामांचा सामना करत आहेत. आपण जगाच्या विविध भागांमध्ये वाढत्या भौगोलिक - राजकीय तणावाचे साक्षीदार आहोत. जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय येत आहेत. दरवाढीमुळे अनेक समुदाय त्रस्त आहेत. आणि, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ही जगभरातील प्रमुख चिंता बनली आहे. अनेक देशांची आर्थिक व्यवहार्यता देखील अनिश्चित कर्ज पातळीमुळे धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवरील विश्वास देखील उडाला आहे. ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यात खुपच धीमे आहेत, काही अंशी हे देखील याचे कारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींचे संरक्षक असलेल्या तुमच्यावर अवलंबून आहे. हे काही सोपे काम नाही.

तथापि, मला आशा आहे की तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या चैतन्यातून प्रेरणा घ्याल. भारतीय ग्राहक आणि उत्पादक भविष्याबाबत आशावादी आणि आत्मविश्वासी आहेत. आम्‍हाला आशा आहे की तुम्‍ही तोच सकारात्मक भाव जागतिक अर्थव्‍यवस्‍थेत प्रसारित करू शकाल. मी विनंती करेन की तुमची चर्चा जगातील सर्वात असुरक्षित नागरिकांवर केंद्रित असावी . तशी मी विनंती करतो. सर्वसमावेशक कार्यसूची तयार करूनच जागतिक आर्थिक नेतृत्व जगाचा विश्वास परत मिळवेल. आमच्या जी 20 अध्यक्षतेची संकल्पना- 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' देखील या सर्वसमावेशक दृष्टीकोनाला प्रोत्साहन देते 

महामहिम,

जगाच्या लोकसंख्येने 8 अब्जांचा आकडा ओलांडला असतानाही शाश्वत विकास लक्ष्यांवरील प्रगती मंदावलेली आहे. हवामान बदल आणि उच्च कर्ज पातळी यांसारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय विकास बँकांना बळकट करण्याच्या उद्देशाने आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

महामहिम,

वित्त जगतात, तंत्रज्ञानाचा वरचष्मा वाढत आहे. महामारीच्या काळात, डिजिटल पेमेंटमुळे संपर्करहित आणि निर्बाध व्यवहार शक्य झाले. तथापि, डिजिटल फायनान्समधील काही अलीकडील नवकल्पना देखील अस्थिरता आणि गैरवापराचा धोका निर्माण करत आहेत. मला आशा आहे की तुम्ही तंत्रज्ञानाची शक्ती चांगल्यासाठी कशी वापरली जाऊ शकते याचा शोध काढाल आणि त्याच्या संभाव्य जोखमींचे नियमन करण्यासाठी मानके विकसित कराल. भारताचा स्वतःचा अनुभव एक आदर्श असू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही अत्यंत सुरक्षित, अत्यंत विश्वासार्ह आणि अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. आमची डिजिटल पेमेंट प्रणाली विनामूल्य सार्वजनिक हित म्हणून विकसित केली गेली आहे. यामुळे भारतातील प्रशासन, आर्थिक समावेशन आणि जीवन सुलभतेत आमूलाग्र बदल झाला आहे. भारताची तंत्रज्ञान राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये तुम्ही भेटत असताना, भारतीय ग्राहकांनी डिजिटल पेमेंट व््यवस्था कशा प्रकारे स्वीकारल्या आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला मिळेल. खरे तर, आमच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात आम्ही एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली आमच्या जी 20 पाहुण्यांना भारताचे पाथ-ब्रेकिंग डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वापरण्याची परवानगी देते. जसजसे तुम्ही त्याचा वापर कराल आणि त्याचा वापर सुलभतेचा अनुभव घ्याल, तेसे तुम्हाला समजेल की भारतीय ग्राहकांनी ते इतक्या स्वेच्छेने का स्वीकारले आहे. UPI सारखी उदाहरणे इतर अनेक देशांसाठी आदर्श असू शकतात. जगाबरोबर आमचे अनुभव सामायिक करणे आम्हाला आनंददायी ठरेल. आणि, जी 20 यासाठी एक प्रभावी माध्यम असू शकते.

महामहिम,

 या महत्त्वाच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि अतिशय फलदायी आणि यशस्वी चर्चेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool

Media Coverage

How NPS transformed in 2025: 80% withdrawals, 100% equity, and everything else that made it a future ready retirement planning tool
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology