महान तामिळ कवी सुब्रमण्य भारती यांच्या 100 व्या पुण्यतिथी निमित्त वाराणसीत बनारस हिंदू विद्यापीठात फॅकल्टी ऑफ आर्ट्स मधे तामिळच्या अभ्यासासाठी अध्यासन स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा
सरदार साहेब ज्या "एक भारत-श्रेष्ठ भारताच्या दिशेने काम करत होते, तेच दर्शन महाकवी भारती यांच्या तमिल लेखणीत दिव्यतेने झळाळत आहे
संपूर्ण जगाला आज जाणीव होत आहे की 9/11 सारख्या आपत्तींचे स्थायी समाधान, मानवतेच्या याच मूल्यांआधारे होईल: पंतप्रधान
महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका मात्र नुकसानापेक्षा अधिक वेगाने आपण सावरतो आहोत: पंतप्रधान
मोठ्या अर्थव्यवस्था सावध भूमिकेत असताना भारत सुधारणा करत होता : पंतप्रधान

नमस्कार!

कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी जी, उपमुख्यमंत्री श्री नितीन भाई, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री परशोत्तम रुपाला जी, श्री मनसुखभाई मांडवीय जी, अनुप्रिया पटेल जी लोकसभेतील खासदार आणि गुजरात प्रदेश जनता पार्टीच्या अध्यक्षा श्रीमाती मानसी पाटील जी, गुजरात सरकारमधले सगळे मंत्री, इथे उपस्थित सर्व सहकारी खासदार, गुजरातचे आमदार, सरदार धाम चे सर्व विश्वस्त, माझे बंधू, श्री गागजी भाई, विश्वस्त मंडळाचे सदस्य, या पवित्र कार्यात आपले योगदान देणारे सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो..

कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतांना गणेश पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे.  सुदैवाने सरदार धाम भवनाचा श्रीगणेशाचा गणेशोत्सवाच्या पवित्र प्रसंगी होत आहे. काल गणेश चतुर्थी होती आंनी आताही संपूर्ण देशभर गणेशोत्सव साजरा होत आहे. मी आपल्या सर्वांना गणेश चतुर्थी आंनी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज ऋषी पंचमी आहे. भारत तर ऋषीपरंपरांचा देश आहे. ऋषींचे ज्ञान, विज्ञान आणि दर्शनाने आपली ओळख सिद्ध होत असते. आपण सर्वांनीच हा वारसा पुढे न्यायचा आहे. आपले वैज्ञानिक, आपले विचारवंत यांनी संपूर्ण मानवतेलां मार्गदर्शन करावे, याच भावनेसह आपण मोठे झालो आहोत. याच भावनेने तुम्हा सगळ्यांना मी ऋषी पंचमीच्या शुभेच्छा देतो.

ऋषिमुनींची परंपरा आपल्याला एक उत्तम माणूस बनण्याची ऊर्जा देत असते. याच भावनेने आपण पर्यूषण पर्वानंतर जैन परंपरेनुसार आपण क्षमावाणी दिवस पाळत असतो. ‘मिच्छामि दुक्कड़म्' अशी प्रार्थना करत असतो. माझ्याकडून, आपल्या सर्वांना, देशातील सर्व नागरिकांना 'मिच्छामि दुक्कड़म्'. हे एक असे पर्व आहे, अशी परंपरा आहे- ज्यात माणूस आपल्या चुका स्वीकारतो, त्यांचा विचार करतो आणि भविष्यात या चुका न करता स्वतःला मानव म्हणून अधिक उन्नत करण्याचा संकल्प करतो. असा विचार आपल्या आयुष्याचाच भाग असयालां हवा. मी सर्व देशबांधव आणि सर्व बंधू- भगिनींना या पवित्र पर्वासाठी देखील अनेक शुभेच्छा देतो आणि भगवान महावीर यांच्या चरणी वंदन करतो.

आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत सरदार वल्लभभाई पटेल, यांच्या चरणांना देखील मी वंदन करतो, त्यांना आदरांजली वाहतो. सरदार धाम हा सेवा प्रकल्प साकार करण्यासाठी, ज्यांनी समर्पित वृत्तीने काम केले, अशा विश्वस्त मंडळाशी सबंधित सर्व सदस्यांचे मी अभिनंदन करतो. आपण सर्वांनी समर्पित भावनेने केलेला हा सेवा-संकल्प एक आदर्श उदाहरण आहे. आपल्या प्रयत्नांमुळेच आज सरदार धामच्या या भव्य भवनाच्या लोकार्पणासोबतच, दुसऱ्या टप्प्यातील, कन्या वसतिगृहाचेई भूमिपूजन झाले आहे.

अत्याधुनिक, सर्व सेवा-सुविधांनी युक्त अशी इमारत, आधुनिक साधने असलेले वसतिगृह, आधुनिक वाचनालय, या सगळ्या व्यवस्था युवकांना अधिक सक्षम करतील. एकीकडे आपण सगळे लोक उद्यमशीलता विकास केंद्राच्या(Entrepreneur development centre ) मार्फत गुजरातची व्यापारी राज्य म्हणून ओळख अधिक समृद्ध करत आहात, तर दुसरीकडे, नागरी सेवा केंद्राच्या (Civil Service Centre)मार्फत, नागरी सेवा व्यवस्थेत किंवा संरक्षण अथवा न्यायव्यवस्थेत जाऊ इच्छिणाऱ्या युवकांना नवी दिशा दिली जात आहे.

पाटीदार समाजाच्या युवकांसोबतच, गरीब आणि विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणावर आपण भर दिला आहे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. वसतिगृहाची सुविधा देखील कित्येक मुलींना पुढे जाण्यात मदत करणारी ठरेल. 

येत्या काळात, सरदार धाम देशाच्या भविष्य निर्मितीचे एक अधिष्ठान ठरेल, एवढेच नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना सरदार पटेल यांच्या आदर्शांनुसार जगण्याची प्रेरणाही इथूनच मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. आणखी एक विशेष गोष्ट सांगू इच्छितो. आज आपण सगळे स्वातंत्र्याचां अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र्याची 75 वर्षे अशा प्रसंगी, आपण सर्व जण आज देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मरण करत त्यापासून प्रेरणा घेत आहोत. मात्र या वसतिगृहात जी मुले-मुली राहणार आहेत, शिकणार आहेत आणि आज जे 18, 20, 25 या वयातील आपले युवा आहेत ते 2047 साली जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा हे सगळे युवकच निर्णायक भूमिकेत असतील. आज आपण सगळे जो संकल्प करणार आहात, त्याचीच परिणती 2047 साली ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळचा भारत कसा असेल, याच संस्कार घडवणारी आपल्या दिसणार आहे.

 

मित्रांनो,

सरदार धामचे आज ज्या तारखेला लोकार्पण होत आहे, ही तारीख जेवढी महत्वाची आहे, तेवढेच महत्त्व, त्याच्याशी सबंधित असलेल्या संदेशालाही आहे, आज 11 सप्टेंबर, म्हणजेच- 9/11 आहे. जगाच्या इतिहासात, एक अशी तारीख जी मानवतेवरील हल्ल्यासाठी देखील ओळखली जाते. मात्र, याच तारखेने जगाला खूप मोठी शिकवणही दिली आहे.

एका शतकापूर्वी, 11 सप्टेंबर 1893 चाच तो दिवस होता, ज्यादिवशी शिकागो इथे विश्व धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. आजच्याच दिवशी, स्वामी विवेकानंद यांनी त्याच वैश्विक व्यासपीठावर उभे राहत जगाला भारताच्या मानवी मूल्यांची ओळख करुन दिली होती. 9/11 च्या ज्या भीषण हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यानंतर आज संपूर्ण जगाला हे जाणवते आहे, की शतकांसाठीच्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आपल्याला त्याच मानवी मूल्यांची कास धरावी लागेल. एकीकडे आपल्याला त्या दहशतवादी घटनांमधून धडा घ्यायला हवा, तर त्याचवेळी मानवी मूल्यांसाठी संपूर्ण श्रद्धा ठेवून प्रयत्न देखील करत राहायला हवे आहे. 

 

मित्रांनो,

आज 11 सप्टेंबर आणखी एका दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. आज भारताचे महान विद्वान, दार्शनिक आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रम्ह्ण्यम भारती यांचीही 100 वी पुण्यतिथी आहे. सरदार पटेल यांनी ज्या ‘एक भारत-श्रेष्ठ भारताची’ दूरदृष्टी ठेवून पावले उचलली होती, तोच विचार, महाकवी भारती यांच्यां तामिळ साहित्यात आपल्याला दिसतो. जेव्हा ते म्हणत असत- ‘हिमालय हमारा है.... तामिळनाडूत राहत होते, मात्र विचार संपूर्ण देशाचा होता, म्हणूनच म्हणत असत- हिमालय हमारा है. जेव्हा ते म्हणत असत, गंगेचा प्रवाह असा आहे आणि तो कुठे जाऊन मिळेल, तेव्हा ते उपनिषदांचे महात्म्य वर्णन करत असत, त्यावेळी ते भारताची एकता आणि श्रेष्ठतेला अधिक भव्य स्वरूपात व्यक्त करत असत. सुब्रम्ह्ण्यम भारती यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली, श्री अरविंद यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. आणि काशीच्या वास्त्यव्यात त्यांनी आपल्या विचारांना नवी ऊर्जा दिली, नवी दिशा दिली.

मित्रांनो,

आज या प्रसंगी मी आणखी एक महत्वाची घोषणा करतो आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालयात सुब्रम्ह्ण्यम भारती यांच्या नावाने एक अध्यासन सुरु केले जाणार आहे. ‘तामिळ अध्ययन’ हे अध्यासन. तामिळ भाषा समृद्ध भाषा आहे, जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे, आणि ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला विभागात, तामिळ अध्ययनासाठी सुब्रम्ह्ण्यम भारती अध्यासन सुरु केले जाणार आहे. हे अध्यासन, विद्यार्थ्यांना, संशोधन करणाऱ्यांना, सुब्रम्ह्ण्यम भारती यांनी कल्पना केलेल्या भव्य भारत देशाची निर्मिती करण्यासाठी सातत्याने प्रेरणा देत राहील.

 

मित्रांनो,

सुब्रम्ह्ण्यम भारती जी नेहमीच भारताच्या एकतेविषयी बोलत, सर्व मानवतेच्या एकतेवर भर देत असत. भारतातील आदर्श आणि दर्शने यात, त्यांचे हे विचार एक अविभाज्य घटक आहे. आपल्याकडे पुराणकाळात झालेले दाधिची आणि कर्णासारखे दानवीर असो किंवा मध्ययुगात झालेले महाराज हर्षवर्धन यांच्यासारखे महापुरुष असोत, सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याच्या याच परंपरेतून भारत आजही प्रेरणा घेतो आहे.

हा एक असा जीवनमंत्र आहे जो आपल्याला शिकवतो, की आपल्याला इथे जितकं मिळतं, त्यापेक्षा अनेक पटींनी आपल्याला परत द्यायचं असतं. आपल्याला जे काही मिळालं आहे ते, या भूमीतूनच मिळालं आहे. आपण जी प्रगती केली आहे, ती या समाजात राहूनच केली आहे, समजामुळे केली आहे. म्हणून आपल्याला जे मिळालं आहे ते केवळ आपलं नाही, तर सगळ्या समाजाचं आहे. जे समाजाचं आहे ते समाजाला परत द्यायचं असतं. आणि समाज त्यात अनेक  पटींनी भर घालून आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ते परत करत असतो. हे एक असे उर्जा चक्र आहे, अशी एनर्जी सायकल आहे, जे प्रत्येक प्रयत्नांसोबत अधिक वेगवान होत जाते. आपण याच उर्जा चक्राला गती देत आहात.

 

मित्रांनो,

जेव्हा आपण समाजासाठी कुठलाही संकल्प सोडतो, तेव्हा तो पूर्ण करण्यासठी समाजच आपल्याला शक्ती देत असतो. म्हणूनच, आज अशा एका कालखंडात, जेंव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेंव्हा देशाने, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या सोबतच, ‘सबका प्रयास’हा मंत्र दिला आहे. गुजरात तर वर्षानुवर्षे, भूतकाळापासून आजपर्यंत एकत्रित प्रयत्नांची भूमी आहे. स्वातंत्र्यलढ्यात  गांधीजींनी इथूनच दांडी यात्रा सुरु केली होती, जी आज देखील स्वातंत्र्यासाठीच्या ऐक्याचे प्रतिक आहे, प्रेरणा आहे. याच प्रकारे, खेडा आंदोलनात सरदार पटेलांच्या नेतृत्वात शेतकरी, तरुण, गरीब एकत्र आले आणि इंग्रज सत्तेला त्यांच्या ऐक्यापुढे झुकावं लागलं. ती प्रेरणा, ती उर्जा आज देखील सरदार साहेबांच्या गगनचुंबी पुतळा, ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’च्या रुपात गुजरातच्या धरतीवर, आपल्या समोर उभी आहे. जेव्हा स्टॅच्यु ऑफ युनिटीची संकल्पना गुजरातने देशासमोर ठेवली, तेव्हा सगळ्या देशाने ती उचलून धरली आणि यात सहभाग घेतला. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शेतकऱ्यांनी लोखंड पाठवलं होतं. हा पुतळा आज संपूर्ण देशाच्या ऐक्याचं, ऐक्याच्या प्रयत्नांचं प्रेरणास्थळ आहे, प्रतीक आहे.

 

बंधू भगिनींनो,

‘सहकारातून यशाची जी रूपरेषा गुजरातने सादर केली आहे, त्यात देखील देश भागीदार बनला आणि आज देशाला त्याचे लाभही मिळत आहेत. सरदार धाम ट्रस्टने देखील सामुहिक प्रयत्नांतून पुढील पाच आणि दहा वर्षांसाठी लक्ष्य ठरवले आहे. आज देश स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशी अनेक उद्दिष्टे  घेऊन वाटचाल करत आहे.

सरकारने आता एक वेगळे सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. शेतकरी - युवकांना सहकाराच्या शक्तीचे पूर्ण फायदे मिळावेत, यासाठी आवश्यक ती पाउले उचलली जात आहेत. समाजाचे जे वर्ग, जे लोक मागे राहिले आहेत, त्यांना पुढे आणण्यासाठी सतत प्रयत्न होत आहेत. आज एकीकडे दलित मागासांच्या अधिकारांसाठी जबाबदारीने अनेक कामे होत आहेत, तर दुसरीकडे आर्थिक निकषांवर मागासलेल्या सवर्ण समाजाच्या लोकांना देखील 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या धोरणांमुळेच आज समाजात एक नवा आत्मविश्वास निर्माण होत आहे.

 

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटलं जातं - "सत् विद्या यदि का चिन्ता, वराकोदर पूरणे"। म्हणजेच, ज्याच्याजवळ विद्या आहे, ज्ञान आणि कौशल्य आहे, त्याला आपली उपजीविका, आयुष्यातली प्रगती याची चिंता करावी लागत नाही. सक्षम व्यक्ती आपल्या प्रगतीच्या वाटा स्वतःच तयार करतो. मला आनंद आहे की सरदारधाम न्यास  शिक्षण आणि कौशल्य विकासवर खूप भर देत आहे.

आमचे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देखील, शिक्षण कौशल्य विकासावर भर देणारं असावं, या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे. भविष्यात बाजारात कुठल्या कौशल्याला मागणी असेल, भविष्यातील  जगात नेतृत्व  करण्यासाठी आपल्या युवकांना काय हवे असेल, राष्ट्रीय शिक्षण धोरण सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांना या जागतिक परिस्थितीसाठी तयार करेल. आज ‘स्कील इंडिया मिशन’ ला देखील देशात प्राधान्य देण्यात आले आहे. या मिशनच्या अंतर्गत लाखो युवकांना वेगवेगळे कौशल्य शिकण्याची संधी मिळाली आहे, ते आत्मनिर्भर बनत आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजनेअंतर्गत युवकांना शिक्षणासोबतच कौशल्य विकासाची संधी देखील मिळत आहे, आणि त्यांना उत्पन्न देखील मिळत आहे.

‘मानव कल्याण योजना’ आणि यासारख्या दुसऱ्या अनेक योजनांद्वारे गुजरात स्वतः देखील या दिशेने वेगात प्रयत्न करत आहे.आणि यासाठी मी गुजरात सरकारचे अभिनंदन करतो. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आज गुजरातमध्ये एकीकडे शालाबाह्य मुलांचे प्रमाण 1 टक्क्याहूनही कमी आहे, तर दुसरीकडे वेगवेगळ्या योजनांमध्ये कौशल्य विकासातून लाखो युवकांचे भविष्य सकारात आहे. गुजरातच्या युवकांमध्ये उद्यमशीलता उपजतच असते. स्टार्ट अप इंडिया सारख्या योजनांमुळे आज गुजरातच्या युवकांच्या प्रतिभेला एक नवी व्यवस्था मिळते आहे.

सरदार धाम न्यासदेखील आपल्या युवकांना जागतिक व्यापाराशी जोडण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या माध्यमातून कधीकाळी गुजरातने जी सुरवात केली होती, ग्लोबल पाटीदार व्यापार शिखर परिषद ते उद्दिष्ट पुढे नेईल. पाटीदार समाजाची तर ओळखच आहे, की ते जिथे जातात तिथे व्यापाराला नवा चेहरा देतात. आपले हे कौशल्य आता गुजरात आणि देशातच नाही, संपूर्ण जगात ओळखले जात आहे. याच पाटीदार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, हे लोक कुठेही राहिले तरी, भारताचे हित यांच्यासाठी सर्वोच्च असते. आपण देशाच्या आर्थिक विकासात जे योगदान दिले आहे ते अद्भुत आहे आणि प्रेरणादायी देखील आहे.

 

मित्रांनो,

कितीही कठीण काळ असला तरी, आपले कर्तव्य समजून पूर्ण विश्वासाने काम केले जाते, तेव्हा त्याचं फळ देखील निश्चितच मिळतं. कोरोना महामारी आली, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. भारतावर देखील याचा पुष्कळ परिणाम झाला. मात्र आपल्या अर्थव्यवस्थेचं, महामारीमुळे जितकं नुकसान झालं, त्यापेक्षा जास्त वेगाने ती सुधारत आहे. जेव्हा मोठमोठ्या अर्थव्यवस्था बचावात्मक पवित्र्यात होत्या, तेव्हा आपण सुधारणा करत होतो. जेव्हा जागतिक पुरवठा साखळी तुटली होती, तेव्हा परिस्थिती भारताच्या बाजूने वळविण्यासाठी उत्पादन-संलग्न-सवलत (PLI) योजना सुरु केली. आता PLI योजना वस्त्रोद्योग क्षेत्रात देखील लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला, सुरत सारख्या शहरांना, याचा खूप फायदा होईल.

 

मित्रांनो,

21व्या शतकात भारताकडे अपरिमीत संधी आहेत. आपण स्वतःला जागतिक नेतृत्व म्हणून बघितले पाहिजे. आपले सर्वोत्तम द्यायचे आहे आणि सर्वश्रेष्ठ काम करायचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की देशाच्या प्रगतीत गुजरातचे जे योगदान आहे, ते आपण आता आणखी सशक्तपणे पुढे आणू. आमचे पर्यंत केवळ आपला समाजच नाही, तर, देशाला देखील विकासाच्या शिखरावर घेऊन जातील.

याच शुभकामानांसह, आपल्या सर्वांना पुन्हा एकदा

खूप खूप  धन्यवाद!

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s digital landscape shows potential to add $900 billion by 2030, says Motilal Oswal’s report

Media Coverage

India’s digital landscape shows potential to add $900 billion by 2030, says Motilal Oswal’s report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister visits Anubhuti Kendra at Bharat Mandapam on completion of 3 years of PM GatiShakti
October 13, 2024
PM GatiShakti has played a critical role in adding momentum to India’s infrastructure development journey: Prime Minister

The Prime Minister, Shri Narendra Modi visited Anubhuti Kendra at Bharat Mandapam on completion of 3 years of GatiShakti today. Shri Modi remarked that PM GatiShakti has played a critical role in adding momentum to India’s infrastructure development journey.

The Prime Minister posted on X;

“Today, as GatiShakti completed three years, went to Bharat Mandapam and visited the Anubhuti Kendra, where I experienced the transformative power of this initiative.”

“PM GatiShakti has played a critical role in adding momentum to India’s infrastructure development journey. It is using technology wonderfully in order to ensure projects are completed on time and any potential challenge is mitigated.”