पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
बेनेट यांना कोविड-19 चे निदान झाले असून त्यांच्या तब्येतीत लवकर आराम पडावा यासाठी पंतप्रधानांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला.
युक्रेनमधील परिस्थितीसह अलीकडील भू-राजकीय घडामोडींवर उभय नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्य उपक्रमांचाही आढावा घेतला.
पंतप्रधानांनी, बेनेट यांचे नजीकच्या काळात भारत भेटीदरम्यान स्वागत करण्यासाठी उत्सुकता व्यक्त केली.


