गेल्या 11 वर्षात, राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एन डी ए सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे: पंतप्रधान
स्वच्छ भारताद्वारे सन्मान निश्चित करण्यापासून ते जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशापर्यंत विविध उपक्रमातून आपल्या नारी शक्तीला सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासावर सरकारचे लक्ष अधोरेखित करून विकसित भारताच्या प्रवासात महिलांनी बजावलेल्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज, त्या केवळ विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात सक्रिय भागच घेत नाहीत, तर शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत प्रत्येक क्षेत्रात नवीन मानदंडही प्रस्थापित करत आहेत. मागील 11 वर्षांत, आपल्या नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे, असेही  मोदी यांनी सांगितले. 

एनडीए सरकारने प्रभावी उपक्रमांच्या माध्यमातून  महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.   स्वच्छ भारत अभियानाद्वारे सन्मानाची खात्री देणे, जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेश आणि तळागाळातील सक्षमीकरण यांचा समावेश आहे. उज्ज्वला योजनेचे उदाहरण देत  त्यांनी अनेक घरांमध्ये धुरमुक्त स्वयंपाकघरे आणणारा एक मैलाचा दगड म्हणून उल्लेख केला. मुद्रा कर्ज योजनेमुळे लाखो महिला उद्योजक झाल्या असून, त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकल्या आहेत,  हे देखील त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर घरे देण्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि सक्षमीकरणाच्या भावनेवर उल्लेखनीय परिणाम झाला आहे.

पंतप्रधानांनी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेची आठवण काढत ही चळवळ मुलींच्या संरक्षणासाठी एक राष्ट्रीय चळवळ असल्याचा उल्लेख  केला.

मोदी म्हणाले की,  विज्ञान, शिक्षण, खेळ, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांसह सर्व क्षेत्रांमध्ये महिला उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत.

पंतप्रधानांनी एक्स या सामाजिक माध्यमांवरील पोस्ट मालिकेद्वारे टिप्पण केले की ,

"आपल्या माता, बहिणी आणि मुलींनी असे काही दिवस  पाहिले आहेत, त्यावेळी त्यांना प्रत्येक पावलावर अडचणींना तोंड द्यावे लागायचे.  परंतु, आज त्या केवळ विकसित भारताच्या संकल्पात सक्रियपणे सहभागीच होत नाहीत तर शिक्षणापासून व्यवसायापर्यंत प्रत्येक क्षेत्रात उदाहरणे देखील निर्माण करत आहेत.  गेल्या 11 वर्षात नारी शक्तीचे यश सर्व नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. 

11YearsOfSashaktNari"

 

गेल्या 11 वर्षांत, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची पुनर्व्याख्या केली आहे.

स्वच्छ भारतातून प्रतिष्ठा निश्चित  करण्यापासून ते जनधन खात्यांद्वारे आर्थिक समावेशापर्यंत विविध उपक्रम, आपल्या नारीशक्तीला सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. उज्ज्वला योजनेने अनेक घरांमध्ये धूरमुक्त स्वयंपाकघर आणले. मुद्रा कर्जामुळे लाखो महिला उद्योजकांना त्यांची  स्वप्ने पूर्ण करण्यास सक्षम केले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महिलांच्या नावे घरे दिल्यामुळे सशक्तीकरणात लक्षणीय परिणाम झाला. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेने मुलींच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप घेतले. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दल अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिला यशस्वी होत आहेत आणि इतरांना प्रेरणा देत आहेत.

11YearsOfSashaktNari"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein

Media Coverage

Rooftop solar, KUSUM account for 40% of Indias solar capacity additions in FY27 till July: Bernstein
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान 27 ऑगस्ट रोजी 'खेलो इंडिया संवाद'मध्ये तरुणांना करणार संबोधित
August 26, 2026
'खेलो इंडिया संवाद' क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी,स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणणार
'खेलो इंडिया संवाद' अंतर्गत होणारा 'युवा संवाद' क्रीडा, ऑलिम्पिक आकांक्षा, युवा नेतृत्व, विकसित भारत आणि नशामुक्त युवा या पाच प्रमुख विषयांवर केंद्रित असेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'खेलो इंडिया संवाद'ला संबोधित करतील. भारताच्या क्रीडा प्रवासात तरुणांना सहभागी करून घेणे, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणे आणि समृद्ध युवा-नेतृत्वाखालील विकसित भारतासाठी त्यांच्या विचारांचे योगदान मिळवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

'मेरा युवा भारत' (MY Bharat) द्वारे राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमधील तरुणांच्या सहभागासह देशभरात आयोजित केला जाईल. तरुणांच्या आकांक्षांना राष्ट्रीय विकासाच्या विषयपत्रिकेच्या केंद्रस्थानी ठेवून एक तंदुरुस्त, शिस्तबद्ध आणि क्रीडाप्रेमी राष्ट्र घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

देशव्यापी 'खेलो इंडिया संवाद' हा क्रीडा, युवा नेतृत्व, नागरी जबाबदारी, स्वयंसेवा, तंदुरुस्ती आणि राष्ट्र उभारणीला एका सामायिक मंचावर आणेल. हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा आकांक्षांशी थेट जोडण्याचे माध्यम ठरेल, तसेच त्यांच्या कल्पना आणि दृष्टिकोन हे भारतातील युवा व क्रीडा परिसंस्थेमधील सतत सुरू असलेल्या संवादाचा भाग बनतील याची निश्चिती करेल.

या राष्ट्रीय कार्यक्रमानंतर तरुण सहभागी, 'माय भारत' स्वयंसेवक, स्थानिक खेळाडू आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असलेले स्थानिक संवाद आयोजित केले जातील. खेळांमध्ये रस असलेले तरुण आणि भारतातील प्रमुख खेळाडू व पदकविजेते यांच्यातील थेट संवाद हे या उपक्रमाचे एक मुख्य वैशिष्ट्य असेल.

'युवा संवाद' हे या कार्यक्रमाचे एक मध्यवर्ती वैशिष्ट्य असून यामध्ये तरुण सहभागींना त्यांच्या स्वतःच्या संकल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले जाईल. हा संवाद खालील पाच विषयांवर आधारित असेल:

  • अधिक चांगल्या सुविधा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान आणि सर्वसमावेशक सहभागाद्वारे भारताच्या क्रीडा परिसंस्थेत सुधारणा करणे
  • वैज्ञानिक प्रतिभा शोध, पारदर्शक निवड आणि दीर्घकालीन खेळाडू विकासाद्वारे 2036 ऑलिम्पिकसाठी कलागुणांची जोपासना करणे.
  • शासन व्यवस्था मंच आणि 'माय भारत' संचालित स्वयंसेवेच्या माध्यमातून युवा नेते तयार करणे.
  • नागरी कर्तव्यभावना, भविष्याभिमुख कौशल्ये आणि संरचित स्वयंसेवेची निर्मिती करून विकसित भारतासाठी तरुणांचे सक्षमीकरण करणे;
  • अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात लढा देण्यासाठी 2 ऑगस्ट 2026 रोजी सुरु झालेल्या पंतप्रधानांच्या 100 आठवड्यांच्या देशव्यापी अभियानाअंतर्गत साप्ताहिक जनभागीदारी उपक्रमांद्वारे बळकट केलेल्या, क्रीडा आणि समवयस्क नेटवर्कचा वापर करून 'नशामुक्त युवा' चळवळीला प्रोत्साहन देणे.