पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत केले. उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली.
भारत-यूएई मैत्री वृध्दिंगत करण्यासाठी युवराज शेख खालिद यांनी दाखवलेल्या उत्कटतेचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
पंतप्रधानांनी समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केले;
“अबू धाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करताना आनंद झाला. आमची विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली. भारत-यूएई मैत्री मजबूत व्हावी याविषयी त्यांना असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते.”
It was a delight to welcome HH Sheikh Khaled bin Mohamed bin Zayed Al Nahyan, Crown Prince of Abu Dhabi. We had fruitful talks on a wide range of issues. His passion towards strong India-UAE friendship is clearly visible. pic.twitter.com/yoLENhjGWd
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2024