महर्षी दयानंद सरस्वती यांची आज जयंती असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांना आदरांजली वाहताना मोदी म्हणाले, “केवळ शिक्षणाच्या प्रसारासाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या समृद्धसाठीही त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशातील लोकांसाठी प्रेरणा देत राहतील,” असे त्यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदी ‘एक्स’ वरील संदेशात म्हणाले:
“संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित करणाऱ्या महर्षी दयानंद सरस्वती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक आदरांजली. त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या समृद्धीसाठीही अतुलनीय यगदान दिले. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न देशातील नागरिकांना प्रेरणा देत राहतील.”
मां भारती की सेवा में आजीवन समर्पित रहे महर्षि दयानंद सरस्वती जी को उनकी जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने शिक्षा को बढ़ावा देने के साथ-साथ भारतीय संस्कृति और परंपरा की समृद्धि के लिए अतुलनीय योगदान दिया। सामाजिक सुधार के उनके प्रयास देशवासियों के लिए प्रेरणापुंज बने…
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2026


