श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ.हरिनी अमरसूर्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी त्यांचे स्नेहमय स्वागत केले, आणि ते म्हणाले की, त्यांच्या भेटीमुळे भारत-श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक आणि बहुआयामी संबंधांना नवी गती मिळेल.
पंतप्रधानांनी यंदाच्या एप्रिलमध्ये श्रीलंकेला दिलेल्या आपल्या राजकीय भेटीचे स्मरण केले. या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायका यांच्याशी सहकार्याच्या सर्व क्षेत्रांवर केलेल्या फलदायी चर्चेचा त्यांनी उल्लेख केला.
दोन्ही नेत्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष विकास सहकार्य आणि आपल्या मच्छिमारांचे कल्याण, यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
भारत आणि श्रीलंकेमधील विशेष संबंधांवर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या सामायिक विकास प्रवासात एकत्र काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष दिसानायका यांना शुभेच्छा दिल्या आणि हे संबंध कायम ठेवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
Glad to welcome Prime Minister of Sri Lanka, Ms. Harini Amarasuriya. Our discussions covered a broad range of areas, including education, women's empowerment, innovation, development cooperation and welfare of our fishermen. As close neighbours, our cooperation holds immense… pic.twitter.com/5ARYRVl5Ts
— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2025


