पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील गतिशील शहर विशाखापट्टणम येथे गुगल एआय हबच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

गिगावॅट-स्तरावरील डेटा सेंटर पायाभूत सुविधा समाविष्ट असलेली ही बहुआयामी गुंतवणूक "विकसित भारत" या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

"ही गुंतवणूक तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. ही योजना सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सुनिश्चित करेल, नागरिकांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देईल, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान अग्रणी  बनवेल," असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :

"विशाखापट्टणम या गतिशील शहरात गुगल एआय हबच्या उद्घाटनामुळे अत्यंत आनंदित आहे.

गिगावॅट-स्तरावरील डेटा सेंटर पायाभूत सुविधा समाविष्ट असलेली ही बहुआयामी गुंतवणूक 'विकसित भारत' या आपल्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

हे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. तसेच, सर्वांसाठी (AI for All) कृत्रिम बुद्धिमत्ता सुनिश्चित करेल, नागरिकांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देईल, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था बळकट करेल आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान अग्रणी म्हणून सुनिश्चित करेल."

@sundarpichai

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 18 जून 2026
June 18, 2026

PM Modi’s Leadership Delivers: Electronic Interlocking, Semiconductor Push & Tariff-Free UK Access