सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष महामहीम निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 आणि 16 जून 2025 असे दोन दिवस सायप्रसचा अधिकृत दौरा करणार आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी सायप्रसला  दोन दशकांपेक्षा जास्त काळाने दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. निकोसिया इथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिस्तोदौलिदीस यांच्याशी चर्चा करतील, तर  लिमासोल इथे ते उद्योग व्यवसाय क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना  संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीतून दोन्ही देशांची द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची तसेच भूमध्य सागरी प्रदेश आणि युरोपीय महासंघासोबत भारताचे संबंध अधिक  मजबूत करण्याप्रतिची परस्परसामायिक वचनबद्धता अधोरेखित होणार आहे.

आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅनडाचे पंतप्रधान महामहीम मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरुन, G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 16 आणि 17 जून 2025 असे दोन दिवस कॅनडामधील कॅनानास्किसचा दौरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा G-7 शिखर परिषदेतील हा सलग 6 वा सहभाग असणार आहे. या परिषदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 सदस्य देशांचे नेते, इतर आमंत्रित देशांचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत  ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा क्षेत्राची सांगड आणि क्वांटम तंत्रज्ञानाशी संबंधित महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत.

आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहीम आंद्रेज प्लेंकोविच यांच्या निमंत्रणावरुन, 18 जून 2025 रोजी क्रोएशियाला अधिकृत भेट देणार आहेत. भारतीय पंतप्रधानांची क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट असणार आहे. या भेटीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा ऐतिहासिक  टप्पा गाठला जाणार आहेत. आपल्या क्रोएशिया भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लेंकोविच यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसेच क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम झोरान मिलानोविच यांचीही भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रोएशिया दौऱ्यातून भारताची युरोपीय महासंघामधील भागीदार देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत करण्याची वचनबद्धताही अधोरेखित होणार आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."