पंतप्रधान जळगाव येथे होणाऱ्या लखपती दीदी संमेलनात होणार सहभागी
पंतप्रधान 11 लाख नवीन लखपती दीदींना सन्मानित करून त्यांना देणार प्रमाणपत्र
पंतप्रधान 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील आणि 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित करतील
पंतप्रधान जोधपूर येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाला करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. तर साडेचार वाजण्याच्या सुमाराला जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान महाराष्ट्रात

पंतप्रधान जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन 11 लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार असून त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत.

पंतप्रधान  2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ  4.3 लाख बचत गटातील सुमारे 48 लाख सदस्यांना होईल. याशिवाय ते 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करणार असून त्याचा लाभ 2.35 लाख बचत गटातील 25.8 लाख सदस्यांना होईल.

लखपती दीदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दीदी झाल्या आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांचा राजस्थान दौरा

पंतप्रधान जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित, राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थान उच्च न्यायालय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन देखील होणार आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games

Media Coverage

Jumbo Indian contingent comprising 768 athletes, support staff and officials for Asian Games
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026
September 04, 2026

Make in India, Power India, Play for India: Multi-Sector Momentum Under PM Modi’s Leadership