पंतप्रधान नागपूर मधील स्मृती मंदिर येथे दर्शन घेणार
पंतप्रधान नागपूर मध्ये दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहणार
पंतप्रधान नागपूर मध्ये माधव नेत्रालय प्रीमिअम केंद्राची पायाभरणी करणार
नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार
पंतप्रधानांच्या हस्ते बिलासपूर येथे सुमारे 33,700 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध विकासकामांची पायाभरणी, कार्याचा शुभारंभ आणि राष्ट्रार्पण होणार
छत्तीसगड मध्ये ऊर्जेची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि ग्रीडच्या मजबुतीच्या उद्देशाने विविध ऊर्जा निर्मिती आणि पारेषण प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत
छत्तीसगड मध्ये विशेषतः आदिवासी आणि औद्योगिक वसाहतीत संपर्कव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीने बहुविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल
या भागातील शिक्षण क्षेत्राशी निगडित पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी पंतप्रधान छत्तीसगड मधील 29 जिल्ह्यांमध्ये 130 पी एम श्री शाळांचे लोकार्पण करणार
सर्वांसाठी घरे या दृष्टिकोनानुसार छत्तीसगडमध्ये होणार प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय -जी) अंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांचा गृहप्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगढला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम नागपूरला जातील आणि सकाळी 9 वाजता स्मृती मंदिर येथे दर्शन घेऊन त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देतील.

साधारण दहा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मध्ये माधव नेत्रालय प्रीमिअम केंद्राची पायाभरणी होणार असून त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

त्यानंतर दुपारी 12:30 वाजता, ते नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड येथे लॉइटरिंग युद्धपयोगी सामग्री चाचणी तळ  आणि यूएव्हीसाठी धावपट्टी सुविधेचे उद्घाटन करतील.

त्यानंतर पंतप्रधान बिलासपूरला जाणार असून साधारण दुपारी साडे तीन च्या सुमारास त्यांच्या हस्ते सुमारे 33,700 कोटी रुपयांहून अधिक  किंमतीच्या विविध विकासकामांची पायाभरणी,  कार्याचा शुभारंभ आणि राष्ट्रार्पण होणार आहे. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.

 

पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा

हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील आणि आर एस एस च्या संस्थापकांना आदरांजली वाहतील. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह 1956 मध्ये ज्या ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्या दीक्षाभूमीला भेट देऊन पंतप्रधान आदरांजली वाहतील.

पंतप्रधान माधव नेत्रालय नेत्र चिकित्सा आणि संशोधन केंद्राच्या नवीन विस्तारित इमारतीची म्हणजे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी करतील. 2014 मध्ये स्थापन झालेले हे नेत्रालय नागपूरमधील एक प्रमुख सुपर-स्पेशालिटी नेत्ररोग सेवा सुविधा केंद्र आहे. गुरुजी माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन करण्यात आली. आगामी प्रकल्पात 250 खाटांचे रुग्णालय, 14 बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि 14 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर असतील. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आणि जागतिक दर्जाच्या नेत्ररोग संबंधित सेवा प्रदान करणे आहे, हा यामागील उद्देश आहे.

पंतप्रधान नागपुरातील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या दारूगोळा केंद्राला  भेट देणार आहेत.  नि:शस्त्र हवाई वाहनांसाठी (UAVs) नव्याने बांधण्यात आलेल्या 1250 मीटर लांब आणि 25 मीटर रुंद हवाई पट्टीचे आणि लोइटरिंग युद्धसामग्री आणि इतर मार्गदर्शित युद्धसामग्रीची चाचणी घेण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसामग्री आणि वॉरहेड चाचणी सुविधेचे उद्घाटन करतील.

 

पंतप्रधानांचा छत्तीसगड दौरा

पायाभूत सेवासुविधा आणि शाश्वत उपजीविका वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान बिलासपूर येथे ऊर्जा, तेल आणि गॅस, रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि गृहनिर्माण क्षेत्रांशी संबंधित 33,700 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करणार आहेत.

देशभरातील वीज क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान वचनबद्ध आहेत. या अनुषंगाने, किफायतशीर आणि विश्वासार्ह विद्युत सुविधा  उपलब्ध करून देण्यासाठी आणि छत्तीसगडला वीज निर्मितीत स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक पावले उचलली जाणार आहे. ते 9,790 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या बिलासपूर जिल्ह्यातील एनटीपीसीच्या सिपत सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट टप्पा-III (1 X 800 मेगावॅट) ची पायाभरणी करतील. हा पिट हेड प्रकल्प उच्च वीज निर्मिती कार्यक्षमतेसह अत्याधुनिक अल्ट्रा-सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. छत्तीसगड राज्य ऊर्जा निर्मिती कंपनी  लिमिटेडच्या 15,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पहिल्या सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या  (2 X660 MW) कामाचा शुभारंभ ते करतील. ते पश्चिम क्षेत्र विस्तार योजनेअंतर्गत पॉवरग्रीडचे 560 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन वीज पारेषण प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील.  

भारताच्या शून्य उत्सर्जन उद्दिष्टांच्या अनुषंगाने तसेच  वायू प्रदूषण कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा उपाय प्रदान करणे यासाठी  पंतप्रधान मोदी हे छत्तीसगडमधल्या कोरिया जिल्ह्यात तसेच सूरजपूर, बलरामपूर आणि सरगुजा जिल्ह्यांमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या  (बीपीसीएल)  सिटी गॅस वितरण  प्रकल्पाची पायाभरणी करतील. यामध्ये 200  किमी पेक्षा जास्त उच्च दाबाची पाइपलाइन आणि 800  किमी पेक्षा जास्त एमडीपीई (मध्यम घनता पॉलिथिलीन) पाइपलाइन आणि 1,258 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अनेक सीएनजी वितरण आउटलेट समाविष्ट आहेत. ते 2210  कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या(एचपीसीएल) 540  किमी लांबीच्या विशाख-रायपूर पाईपलाईन  प्रकल्पाची पायाभरणीदेखील करतील. या बहु-उत्पादन (पेट्रोल, डिझेल, केरोसीन) पाइपलाइनची क्षमता दरवर्षी 3  दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त असेल.

या प्रदेशातील दळणवळण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून, पंतप्रधान एकूण 108 किमी लांबीच्या सात रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि 2,690 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे एकूण 111  किमी लांबीचे तीन रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. ते अभनपूर-रायपूर विभागात मंदिर हसौद मार्गे मेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवतील. ते छत्तीसगडमध्ये भारतीय रेल्वेच्या रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण देखील राष्ट्राला समर्पित करतील. या प्रकल्पांमुळे गर्दीचा ताण कमी होईल, दळणवळण सुधारेल आणि संपूर्ण प्रदेशात सामाजिक आणि आर्थिक विकास वाढेल.

या प्रदेशातील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने, पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-930  (37 किमी) च्या झलमला ते शेरपार विभागाचे आणि राष्ट्रीय महामार्ग-43  (75 किमी) च्या अंबिकापूर-पाठलगाव विभागाचे पेव्हड  शोल्डरसह दुपदरीकरण करण्यात आलेल्या  अद्ययावत मार्गाचे लोकार्पण  करतील.
पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग-130 डी (47.5 किमी) च्या कोंडागाव-नारायणपूर विभागाच्या पेव्हड शोल्डरसह दुपदरीकरणासाठी  पायाभरणी देखील करतील. 1,270 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या प्रकल्पांमुळे आदिवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये ये-जा करण्यात लक्षणीय सुधारणा होईल ज्यामुळे या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होणे शक्य होईल.

सर्वांसाठी शिक्षण सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान राज्यातील 29 जिल्ह्यांमधील 130 पीएमश्री शाळा आणि रायपूर येथील विद्या समीक्षा केंद्र या  दोन प्रमुख शैक्षणिक उपक्रमांचे लोकार्पण करतील. पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेअंतर्गत 130 शाळांचे अद्यायवतीकरण  केले जाईल. या शाळा सुव्यवस्थित पायाभूत सुविधा, स्मार्ट बोर्ड, आधुनिक प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांद्वारे उच्च दर्जाचे शिक्षण देण्यास मदत करतील. रायपूरमधील विद्या समीक्षा केंद्र शिक्षणाशी संबंधित सरकारी योजनांचे डेटा विश्लेषण आणि ऑनलाइन देखरेख  करण्यात  महत्वपूर्ण ठरेल.

ग्रामीण भागातील कुटुंबांना सुयोग्य घरे उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि एकूण जीवनमान सुधारण्याची वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणअंतर्गत 3 लाख लाभार्थ्यांच्या  गृहप्रवेशचा कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि पंतप्रधान या योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्द करतील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year

Media Coverage

One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जुलै 2026
July 17, 2026

Green Trains, Private Rockets & Global Partnerships — PM Modi’s New India is Playing to Win