पंतप्रधान सिवान येथे पाणी, रेल्वे आणि वीज क्षेत्रासह विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार
गिनीला निर्यात करण्यासाठी मरहोरा कारखान्यात तयार केलेल्या अत्याधुनिक लोकोमोटिव्हला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार
ओदिशा राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षपद पंतप्रधान भूषवणार
पंतप्रधानांच्या हस्ते भुवनेश्वरमध्ये 18,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार
विशाखापट्टणममध्ये 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे पंतप्रधान नेतृत्व करणार
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ची संकल्पना "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" असून ही संकल्पना व्यक्ती आणि ग्रहीय कल्याणातील सामंजस्यावर भर देते

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

त्यानंतर, ते ओदिशातील भुवनेश्वरला भेट देतील आणि सायंकाळी 4:15 च्या सुमारास  ओदिशा  राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ते 18,600  कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील.

21 जून रोजी, पंतप्रधान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन-सामूहिक योग प्रात्यक्षिकात सहभागी होतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पंतप्रधान बिहारमध्ये

बिहारमधील पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान सिवान येथे विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.

या प्रदेशात रेल्वेच्या  पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, पंतप्रधान 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  नवीन वैशाली-देवरिया रेल्वे मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि या मार्गावरून नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. तसेच , उत्तर बिहारमध्ये कनेक्टिव्हिटीला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान मुझफ्फरपूर आणि बेतिया मार्गे पाटलीपुत्र आणि गोरखपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

"मेक इन इंडिया - मेक फॉर द वर्ल्ड" या दृष्टिकोनाला चालना देत  पंतप्रधान गिनीमध्ये निर्यात करण्यासाठी मरहोरा कारखान्यात तयार केलेल्या अत्याधुनिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवतील. या कारखान्यात उत्पादित होणारी आणि निर्यात होणारी ही पहिली लोकोमोटिव्ह आहे. ती  उच्च-अश्वशक्ती इंजिन, प्रगत एसी प्रोपल्शन सिस्टम, मायक्रोप्रोसेसर-आधारित नियंत्रण प्रणाली, एर्गोनॉमिक कॅब डिझाइन आणि रिजनरेटिव्ह  ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

गंगा नदीच्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाप्रति आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान नमामि गंगे प्रकल्पांतर्गत 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या  सहा सांडपाणी प्रक्रिया संयंत्रांचे (एसटीपी) उद्घाटन करतील आणि या प्रदेशातील लोकांच्या गरजा पूर्ण करतील.

पंतप्रधान बिहारमधील विविध शहरांमध्ये 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची (एसटीपीची) पायाभरणी करतील. या शहरांमधील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्याचा या प्रकल्पांचा उद्देश आहे.  

या प्रदेशातील उर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान बिहारमध्ये 500 मेगावॅट क्षमतेच्या बॅटरी उर्जा साठवण प्रणाली (बीईएसएस) स्थापनेची पायाभरणी करतील. ही बीईएसएस स्वतंत्र प्रणाली राज्यातील मुझफ्फरपूर, मोतिहारी, बेतिया, सिवान या सारख्या 15 ग्रिड सबस्टेशनवर बसवली जात आहे. प्रत्येक सबस्टेशनवर बसवल्या जाणाऱ्या बॅटरीची क्षमता 20 ते 80 मेगावॅट आहे. या प्रणालीमुळे वीज वितरण कंपन्यांना महागड्या दराने वीज खरेदी करण्याची गरज भासणार नाही, कारण आधीच साठवलेली वीज थेट ग्रिडमध्ये परत पाठवता येईल आणि ग्राहकांना त्याचा थेट लाभ होईल.

बिहारमधील प्रधानमंत्री आवास योजना शहरी (पीएमएवाय-यू) च्या 53,600 हून अधिक लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पहिला हप्ता प्रदान केला जाणार आहे. याशिवाय, ते प्रधानमंत्री आवास योजनेतील पूर्ण झालेल्या 6,600 हून अधिक घरांच्या गृहप्रवेश समारंभाच्या निमित्ताने काही लाभार्थ्यांना चाव्या देखील प्रदान करतील.

ओडिशामधील पंतप्रधानांचे कार्यक्रम 

पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये ओडिशा सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवतील. 

ओडिशाच्‍या सर्वांगीण विकासासाठीच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान 18,600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील. या प्रकल्पांमध्ये पिण्याचे पाणी, सिंचन, कृषी पायाभूत सुविधा, आरोग्य पायाभूत सुविधा, ग्रामीण रस्ते आणि पूल, राष्ट्रीय महामार्गांचे काही भाग आणि एक नवीन रेल्वे मार्ग यांचा समावेश असेल.

जिल्ह्याचे राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी एकात्मतेसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून, पंतप्रधान पहिल्यांदाच बौध जिल्ह्याला रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवणाऱ्या नवीन रेल्वे सेवांना हिरवा झेंडा दाखवतील.

स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत वाहतुकीला मोठी चालना देण्यासाठी, पंतप्रधान आधुनिक, पर्यावरणपूरक शहरी गतिशीलता नेटवर्कला पाठिंबा देणाऱ्या कॅपिटल रीजन अर्बन ट्रान्सपोर्ट (CRUT) प्रणाली अंतर्गत 100 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान ‘ओडिशा व्हिजन डॉक्युमेंट’ देखील प्रकाशित करतील. 2036 (जेव्हा ओडिशा भारताचे पहिले भाषिक राज्य म्हणून 100 वर्षे पूर्ण करेल) आणि 2047 (जेव्हा भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल) या ऐतिहासिक टप्प्यांवर आधारित असलेले हे व्हिजन डॉक्युमेंट समावेशक आणि भविष्याभिमुख विकासाचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करेल.

सुप्रसिध्द ओडिया नागरिकांच्या योगदानाप्रती आदरांजली म्हणून पंतप्रधान यावेळी ‘बारापुत्र आतिथ्य ग्राम योजना’ उपक्रमाची सुरुवात करतील. सांस्कृतिक पर्यटनाला चालना देतानाच ओदिशाच्या वारशाचा सन्मान करत, वस्तुसंग्रहालये, इंटरप्रीटेशन केंद्रे, पुतळे, वाचनालये आणि सार्वजनिक जागा यांच्या माध्यमातून प्रसिध्द व्यक्तींच्या जन्मस्थळांचे सचेत  स्मारकांमध्ये रुपांतर करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राज्यातील समृद्धता आणि स्वावलंबन यांचे प्रतीक ठरलेल्या 16.50 लाखापेक्षा जास्त  लखपती दीदींच्या कामगिरीचा सोहोळा साजरा करत पंतप्रधान ओदिशा राज्यातील यशस्वी महिलांचा सन्मान करतील.

पंतप्रधानांची आंध्रप्रदेश भेट

11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (आयडीवाय), विशाखापट्टणम् येथे आयोजित राष्ट्रीय उत्सवाचे नेतृत्व पंतप्रधान करतील. सुसंवादी योग प्रात्यक्षिकांमध्ये देशाचे नेतृत्व करत पंतप्रधान विशाखापट्टणम् येथील सागर किनाऱ्यावर सुमारे 5 लाख सहभागींसह सामायिक योग प्रोटोकॉल (सीवायपी) मध्ये भाग घेतील. भारतभरात साडेतीन लाखांहून अधिक ठिकाणी एकाच वेळी योग संगम कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यावर्षी सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देत मायगव्ह आणि मायभारत सारख्या मंचांवर कुटुंबासह योगाभ्यास सारख्या स्पर्धा आणि योग अन प्लग्ड अंतर्गत युवा वर्गावर केंद्रित उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

“एक वसुंधरा, एक आरोग्यासाठी योग” ही यावर्षीची संकल्पना मनुष्य आणि ग्रहाचे आरोग्य यांतील परस्परसंबंध अधोरेखित करते आणि “सर्वे सन्तु निरामयः”च्या भारतीय तत्वज्ञानात रुजलेली सामुहिक स्वास्थ्याची जागतिक संकल्पना प्रतिध्वनित करते. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यासाठी भारताने मांडलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्र महासभेने (युएनजीए) स्वीकारल्यानंतर, 2015 मध्ये हा दिवस साजरा करण्याची  सुरुवात झाल्यापासूनच पंतप्रधानांनी नवी दिल्ली, चंदीगड,लखनौ, म्हैसूर, न्यूयॉर्क (संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय) आणि श्रीनगर अशा विविध ठिकाणी या दिनानिमित्त आयोजित सोहोळ्याचे  नेतृत्व केले आहे. आयडीवाय आता सशक्त जागतिक आरोग्यविषयक चळवळीत रुपांतरीत झाला आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total

Media Coverage

Second consignment of 37.5 tonnes HADR aid reaches flood-hit Nepal; India sends 47.5 tonnes of relief material in total
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 ऑगस्ट 2026
August 28, 2026

India’s Growth Story, Grounded: Inclusion, Exports, and Infrastructure Under One Vision of PM Modi