In a key step to boost connectivity in North-East, PM to inaugurate first greenfield airport in Arunachal pradesh - ‘Donyi Polo Airport, Itanagar’
Airport’s name reflects the age-old indigenous reverence to Sun (‘Donyi’) and the Moon (‘Polo’) in Arunachal Pradesh
Developed at a cost of more than 640 crore, the airport will improve connectivity and will act as a catalyst for the growth of trade and tourism in the region
PM to also dedicate 600 MW Kameng Hydro Power Station to the Nation - developed at a cost of more than Rs 8450 crore
Project will make Arunachal Pradesh a power surplus state
PM to inaugurate ‘Kashi Tamil Sangamam’ - a month-long programme being organised in Varanasi
Programme reflects the spirit of ‘Ek Bharat Shreshtha Bharat’
​​​​​​​It aims to celebrate, reaffirm and rediscover the age-old links between Tamil Nadu and Kashi

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. पंतप्रधान, सकाळी सुमारे 9:30 वाजता, इटानगर इथल्या डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करतील आणि 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केन्द्र राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर ते उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पोहोचतील, तेथे दुपारी 2 वाजता ते ‘काशी तमिळ संगमम्’चे उद्‌घाटन करतील.

अरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधान

ईशान्येकडील दळणवळणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकत, इटानगर येथे ‘डोनी पोलो विमानतळ या अरुणाचल प्रदेशातील पहिल्या हरितक्षेत्र विमानतळाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. विमानतळाचे नाव अरुणाचल प्रदेशातील परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे निदर्शक आहे.  अरुणाचल प्रदेशातील सूर्य ('डोनी') आणि चंद्र ('पोलो') याचा प्राचीन स्वदेशी संदर्भही विमानतळाच्या नावातून दिसतो.

अरुणाचल प्रदेशातील हे पहिले हरितक्षेत्र  विमानतळ 640 कोटी रुपये खर्चून, 690 एकर क्षेत्रफळात विकसित केले गेले आहे. 2300 मीटरच्या धावपट्टीसह, विमानतळ कोणत्याही हवामानामध्‍ये   कामकाजासाठी योग्य असणार आहे. विमानतळ टर्मिनल ही एक आधुनिक इमारत असून, ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा आणि संसाधनांच्या पुनर्वापराला ती प्रोत्साहन देते.

इटानगरमध्ये  नवीन विमानतळ विकसित झाल्यामुळे या प्रदेशातील संपर्क  तर सुधारेलच पण व्यापार आणि पर्यटनाच्या वाढीलाही गती  मिळून  या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल.

या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 600 मेगावॅटचे कामेंग जलविद्युत केंद्र  राष्ट्राला समर्पित करतील. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात 80 किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात पसरलेला, 8450 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च  करून विकसित केलेला  हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशला वीज अधिशेष राज्य बनवेल, तसेच ग्रीड स्थैर्य आणि एकात्मिकता  दृष्टीने राष्ट्रीय ग्रीडसाठी लाभदायक ठरेल.  हरित ऊर्जेचा किंवा पर्यावरण पूरक ऊर्जेचा  अवलंब वाढविण्याच्या देशाच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प मोठे योगदान देईल.

वाराणसीमध्ये पंतप्रधान

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून  प्रेरित, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या कल्पनेचा प्रचार हा सरकारच्या प्रमुख लक्ष्यीत  क्षेत्रांपैकी एक आहे.  याचे प्रतिबिंब असणारा  आणखी एक उपक्रम, 'काशी तमिळ संगम' हा महिनाभर चालणारा कार्यक्रम काशी (वाराणसी) येथे आयोजित केला जात आहे आणि त्याचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे , देशातील सर्वात महत्त्वाची  आणि प्राचीन  अध्ययन पीठ असलेल्या तामिळनाडू आणि काशी या दोन ठिकाणांमधले जुने दुवे पुन्हा शोधणे, पुष्टी करणे आणि त्याचा आनंद घेणे हा आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट दोन प्रांतातील विद्वान, विद्यार्थी, तत्वज्ञ, व्यापारी, कारागीर, कलाकार इत्यादी सर्व स्तरातील लोकांना एकत्र येण्याची, त्यांचे ज्ञान, संस्कृती आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक  करण्याची आणि एकमेकांच्या अनुभवातून  शिकण्याची संधी प्रदान करणे हा आहे. तामिळनाडूतील 2500 हून अधिक प्रतिनिधी काशीला भेट देणार आहेत. ते समान व्यापार, व्यवसाय आणि स्वारस्य असलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्रे, स्थलदर्शन  इत्यादींमध्ये सहभागी होतील. हातमाग, हस्तकला, ओडीओपी (एक जिल्हा एक उत्पादन ) उत्पादने, पुस्तके, माहितीपट, पाककृती, कला प्रकार, इतिहास, पर्यटन स्थळे इत्यादींचे महिनाभर चालणारे प्रदर्शनही काशीमध्ये भरवले जाणार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीच्या संपत्तीला आधुनिक ज्ञान प्रणालींसोबत जोडण्यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये जो  भर देण्यात आला आहे, त्या अनुरूप हा प्रयत्न आहे. आयआयटी मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ हा कार्यक्रम कार्यान्वित करणाऱ्या दोन संस्था आहेत.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian scientists break a century-old limit on turning heat into electricity

Media Coverage

Indian scientists break a century-old limit on turning heat into electricity
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Italian PM Giorgia Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy's postwar history
September 04, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today congratulated Italian Prime Minister Giorgia Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy's postwar history.

The Prime Minister stated that this milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership. He further noted that her friendship has been instrumental in strengthening the India-Italy Special Strategic Partnership, adding that he looks forward to continuing their close cooperation to build a prosperous future for the people of both countries. He extended his best wishes for her continued success in the years ahead.

In a post on X, the Prime Minister shared:

"Congratulations to my friend Prime Minister Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy's postwar history. This milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership.

Her friendship has also been instrumental in strengthening the India-Italy Special Strategic
Partnership and I look forward to continuing our close cooperation to build a prosperous future for the people of our countries.

My best wishes for her continued success in the years ahead.

@GiorgiaMeloni"