पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेष-प्रणित भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून या परिषदेदरम्यान नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरू करण्यात येणार
भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूकीला प्रोत्साहन देणे हे परिषदेचे उद्दिष्ट
परिषदेत डीप टेक स्टार्टअप शोकेसमध्ये भारतातील अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केले जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वाययुजीएम, युग्म परिषदेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

युग्म (संस्कृतमध्ये याचा अर्थ "संगम") ही अशा प्रकारची पहिलीच धोरणात्मक परिषद आहे ज्यामध्ये सरकार, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि नवोन्मेष परिसंस्थेतील अग्रणी उपस्थित राहणार आहेत. वाधवानी फाउंडेशन आणि सरकारी संस्थांच्या संयुक्त गुंतवणुकीसह सुमारे 1,400 कोटी रुपयांच्या सहयोगी प्रकल्पाद्वारे भारताच्या नवोन्मेष प्रवासाला यातून हातभार लागेल.

पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि नवोन्मेष-प्रणीत भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून, या परिषदेदरम्यान विविध प्रमुख प्रकल्प सुरू केले जातील. त्यामध्ये आयआयटी कानपूर (एआय आणि इंटेलिजेंट सिस्टीम्स) आणि आयआयटी बॉम्बे (जैव विज्ञान, जैव तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध) येथील सुपरहब; संशोधन व्यावसायीकरणाला चालना देण्यासाठी आघाडीच्या  संशोधन संस्थांमध्ये वाधवानी इनोव्हेशन नेटवर्क (डब्ल्यू आयएन) केंद्रे; आणि विलंबित प्रकल्पांना संयुक्तपणे निधी देण्यासाठी आणि संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन सोबत भागीदारी यांचा समावेश आहे.

या परिषदेत सरकारी अधिकारी, आघाडीचे उद्योग आणि शैक्षणिक धुरिणांसह  उच्च-स्तरीय गोलमेज परिषदा आणि पॅनेल चर्चा; संशोधनाचे  परिणामात जलद गतीने रूपांतर सक्षम करण्यासाठी कृतिभिमुख  संवाद; संपूर्ण भारतातील अत्याधुनिक नवोन्मेषांचा समावेश असलेला डीप टेक स्टार्टअप शोकेस; आणि सहकार्य आणि भागीदारीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये विशेष नेटवर्किंग संधी यांचा समावेश असेल.

भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेत मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक उत्प्रेरित करणे; प्रमुख तंत्रज्ञानात  संशोधन-ते-व्यावसायीकरण प्रक्रियेला  गती देणे; शैक्षणिक-उद्योग-सरकार भागीदारी मजबूत करणे; एएनआरएफ  आणि एआयसीटीई इनोव्हेशन सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना चालना देणे; संस्थांमध्ये नवोन्मेष अनुमतीचे लोकशाहीकरण करणे; आणि विकसित भारत  @2047 च्या दिशेने राष्ट्रीय नवोन्मेष  संरेखनाला चालना देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Carbon capture can power India’s next steel revolution - H.D. Kumaraswamy

Media Coverage

Carbon capture can power India’s next steel revolution - H.D. Kumaraswamy
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting complete devotion in the service of nation and humanity
February 11, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam highlighting complete devotion in the service of nation and humanity.

"यस्येमे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रं रसया सहाहुः।

यस्येमाः प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम॥"

The Subhashitam conveys, "To the nation, whose greatness is sung by the Himalayas, whose glory flows with the rivers to the ocean, and to whom the directions bow like mighty arms, we offer our entire being in dedication."

Shri Modi stated that the pioneer of Antyodaya, Pandit Deendayal Upadhyaya, also dedicated his life with this very spirit to empower every individual in the country.

The Prime Minister wrote on X;

“सर्वस्व समर्पण उस चेतना की अभिव्यक्ति है, जिसमें राष्ट्र और मानवता सर्वोपरि होती है। अंत्योदय के प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय जी ने भी इसी भावना से देश के जन-जन को सशक्त बनाने के लिए अपना जीवन समर्पित कर दिया।

यस्येमे हिमवन्तो महित्वा यस्य समुद्रं रसया सहाहुः।

यस्येमाः प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवाय हविषा विधेम॥"