पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये दुपारी सुमारे  4:30 वाजता, आशियाई क्रीडा  स्पर्धा  2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंशी संवाद साधतील आणि त्यांना संबोधित करतील.

हा कार्यक्रम म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्याचा आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरित करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह एकूण 107 पदके जिंकली.जिंकलेली  एकूण पदके विचारात घेतल्यास भारताची आशियाई खेळांमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

या कार्यक्रमाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?

Media Coverage

PM Modi inaugurates Northeast’s first Emergency Landing Facility in Moran. Why it matters?
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 फेब्रुवारी 2026
February 15, 2026

Visionary Leadership in Action: From AI Global Leadership to Life-Saving Reforms Under PM Modi