महिलाभिमुख विकासाच्या दिशेने एक महत्त्वाच्या पाऊल, पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचा पंतप्रधान करणार प्रारंभ
पुढील तीन वर्षांत महिला बचत गटांना 15,000 ड्रोन पुरवले जातील
एम्स देवघर येथे विक्रमी 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण
देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही पंतप्रधान करणार शुभारंभ
या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आश्वासनांची हे दोन्ही उपक्रम पूर्तता करतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी  संवाद साधतील. या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचतील हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात 'विकसित भारत संकल्प यात्रा' आयोजित केली आहे.

महिलाभिमुख विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचा ते शुभारंभ करणार आहेत. याद्वारे महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन प्रदान केले जातील जेणेकरून हे तंत्रज्ञान त्यांना उपजीविकेसाठी वापरता येईल. पुढील तीन वर्षांत महिला बचत गटांना 15,000 ड्रोन पुरवले जातील. महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.

आरोग्यसेवा परवडणारी असावी आणि ती सहज उपलब्ध करून देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या दृष्टिकोनाचा पाया आहे. परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना, या दिशेने उचललेल्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देवघर येथील एम्स येथील 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण करतील. देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही पंतप्रधान शुभारंभ करतील.

महिला बचत गटांना ड्रोन प्रदान करणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात  केली होती. हा कार्यक्रम या आश्वासनांची पूर्तता करणारा आहे.

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Railways cuts ticket prices for passenger trains by 50%

Media Coverage

Railways cuts ticket prices for passenger trains by 50%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 फेब्रुवारी 2024
February 28, 2024

Modi Government Ensuring Last-mile Delivery and Comprehensive Development for India